Monday, September 28, 2026

उदयगिरी महाविद्यालयात शालेय जिल्हास्तरीय ग्रामीण बास्केटबॉल स्पर्धा संपन्न (19 वर्षाखालील मुलांच्या गटात उदयगिरी महाविद्यालयाचा संघ प्रथम)


उदगीर:  जिल्हा क्रीडा कार्यालय, लातूर व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय ग्रामीण बास्केटबॉल स्पर्धा (वयोगट 14, 17, 19 वर्षाखालील मुले व मुली) महाविद्यालयात संपन्न झाली. या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील ग्रामीण विभागातून मुलांचे - 26  संघ तर मुलींचे - 21 संघाने सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, संस्थेचे सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, संस्थेचे सदस्य अडेप्पा अंजुरे, भीमाशंकर मुद्दा, निजाम शेख, तालुका शालेय क्रीडा स्पर्धा संयोजक संतोष कोले, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, डॉ. गौरव जेवळीकर, क्रीडा संचालक प्रा. सतीश मुंढे, प्रा. रमजू शेख आदी उपस्थित होते. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच म्हणून रोहित कांबळे, दीपक केंद्रे, मोसिन शेख, अंकुर शिंदे, निलेश बन, दिनेश बन, आदित्य जाधव, प्रताप भालेराव यांनी कामे पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांनी तर प्रास्ताविक संतोष कोले, आभार क्रीडा संचालक प्रा.सतीश मुंढे यांनी केले.


 

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा


उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. संजय बीबीनवरे हे लाभले होते. त्यांनी 'माहितीचा अधिकार' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माहिती अधिकार कायदा काय आहे, त्याचा वापर सामान्य नागरिक कसा करू शकतो, अर्ज कसा करावा आणि या कायद्यामुळे प्रशासनात कशी पारदर्शकता आली याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या अधिकारांसोबतच कर्तव्याचीही जाणीव करून दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बालाजी होकर्णे यांनी केले, तर आभार दिनविशेष समिती प्रमुख प्रा. डॉ. एम. जे. कुलकर्णी यांनी मानले. या प्रसंगी वाणिज्य विभागातील प्रा. डॉ. एस. एन. घोंगडे, प्रा. म्हेत्रे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Saturday, September 26, 2026

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिन उत्साहात साजरा


उदगीर- महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिन विविध शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, सूक्ष्मजीवशास्त्र प्रश्नमंजुषा आणि पोस्टर सादरीकरण अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धांमध्ये सूक्ष्मजीवशास्त्र, प्रतिजैविक प्रतिरोधकता आणि सूक्ष्मजीवांचा मानवी जीवनावरील परिणाम यांसारख्या विषयांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शारदा महाविद्यालय, परभणी येथील डॉ. चामले डी. आर. उपस्थित होते. मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील करिअरच्या संधी तसेच संशोधनाच्या विविध क्षेत्रांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी या विषयातील बदलत्या संधींचा लाभ घेऊन संशोधनवृत्ती विकसित करावी, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. हल्लाळे एस. एन. होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील उपलब्ध शैक्षणिक संधींचा योग्य लाभ घेऊन उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. पोस्टर सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. बिरादार शुभांगी, द्वितीय क्रमांक कु. बिरादार अनघा, तर तृतीय क्रमांक कु. कांबळे प्रतीक्षा यांनी मिळविला. सूक्ष्मजीवशास्त्र प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक केंद्रे श्रीनिवास, द्वितीय क्रमांक करिअप्पा ममता, तर तृतीय क्रमांक कांबळे हर्षद यांनी पटकावला. निबंध लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक पाटील प्रितम, द्वितीय क्रमांक करिअप्पा ममता, तर तृतीय क्रमांक कांबळे रितेश, शेख सफुरा व बिरादार शुभांगी यांनी मिळविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. अल्लापूरे राहुल यांनी केले, तर आभार श्री. लांडगे एस. बी. यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. शैलेश ममदापूरे, डॉ. सबिना शेख, श्री. हाशमी, डॉ. व्ही. एस. नागपुर्णे, कु. मनियार मुस्कान, डॉ. सचिन पाटील तसेच सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Friday, September 25, 2026

उदयगिरीत दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी


उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. इंग्रजी विभागातील प्रा. व्ही. डी. काकनाळे यांच्या हस्ते दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार, दिनविशेष समिती प्रमुख प्रा. डॉ. एम. जे. कुलकर्णी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Thursday, September 24, 2026

भारतीय ज्ञानपरंपरेवर राष्ट्रीय ऑनलाइन व्याख्यान संपन्न


उदगीर - महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी भारतीय ज्ञान प्रणाली या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानात रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय, मुंबई येथील सहाय्यक प्राध्यापक सुश्री कौमुदी शाह यांनी मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात सुश्री शाह यांनी भारतीय ज्ञानपरंपरेचे विज्ञान, गणित, खगोलशास्त्र, धातुशास्त्र, आरोग्य, शिक्षण आदी विविध क्षेत्रांतील योगदान आणि प्राचीन भारतीय ज्ञानाची समृद्ध परंपरा याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा. डॉ. अलापूरे राहुल वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख यांनी तर आभार प्रदर्शन आयकेएस समन्वयक डॉ. एस. एम. सूर्यवंशी, इंग्रजी विभाग यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांच्यासह विविध विभागांतील प्राध्यापक व विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. व्ही. एस. नागपुर्णे, कु. मुस्कान मनियार, डॉ. पी. एस. शेटे व डॉ. सचिन पाटील यांनी सहकार्य केले.

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात हिंदी वक्तृत्व स्पर्धा व राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा


उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात हिंदी पंधरवड्यानिमित्त पदव्युत्तर व संशोधन केंद्र आणि बँक ऑफ महाराष्ट्र, उदगीर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याच कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनही उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून कै. रसिका महाविद्यालय, देवणी येथील प्रा. डॉ. धनराज बिरादार उपस्थित होते. मंचावर सहसचिव प्रशांत पेन्सलवार, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक एस. मिश्रा, प्रबंधक विकास जागींड, हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. बी. एस. भुक्तरे आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. बी. एस. होकरणे उपस्थित होते.
यावेळी बसवराज पाटील नागराळकर यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “भाषा ही माणसांना जोडण्याचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी बहुभाषिक होऊन आपले व्यक्तिमत्त्व घडवावे.” प्रमुख पाहुणे मिश्रा म्हणाले, “प्रादेशिक भाषांना एका सूत्रात बांधण्याचे कार्य हिंदी भाषा करते. इतर भाषांतील अनेक शब्द आत्मसात केल्यामुळे हिंदी भाषा अधिक समृद्ध आणि सार्वत्रिक झाली आहे.” प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले, “राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश ‘माझ्यासाठी नव्हे, तर तुझ्यासाठी’ हा आहे. राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांना सामाजिक भान देणारी बिन भिंतीची शाळा आहे. ”हिंदी वक्तृत्व स्पर्धेत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाची विद्यार्थिनी नाझिया पठाण हिने प्रथम क्रमांक पटकावला. रेवती डोंगरे हिने द्वितीय, तर हावगीस्वामी महाविद्यालयातील क्षितिजा नळगीरे हिने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या विद्यार्थिनींना संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. महादेव नौबदे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. सिद्धेश्वर लांडगे आणि प्रा. शिवनंदा रोडगे यांनी काम पाहिले. भित्तिपत्रक स्पर्धेतील विजेत्या सय्यदा माहीन आणि शेख महेक यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. बी. एस. भुक्तरे यांनी मांडले, सूत्रसंचालन प्रा. डॉ. बी. पी. चनाळे तर आभार प्रा. डॉ. पुष्पलता काळे यांनी मानले. कार्यक्रमास प्रा. डॉ. एन. डी. वगशेट्टे, प्रा. डॉ. सुनंदा भद्रशेट्टी, प्रा. डॉ. गौरव जेवळीकर आणि प्रा. प्रवीण जाहुरे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, September 22, 2026

उदयगिरीच्या हँडबॉल मुलींच्या संघाचा आंतर शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत दैदिप्यमान विजय


उदगीर-  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत अहमदपूर येथे आंतर शालेय जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत आपल्या महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने अनुसूचित जाती विद्यालय, निलंगा आणि कमला नेहरू विद्यालय, बोरी या संघांचा पराभव करून, अंतिम सामन्यात शांती निकेतन, मुळकी-उमरगा या संघाचा पराभव करून 19 वर्षाखालील मुलींच्या गटात विजेतेपद - प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच सदर खेळाडूंची निवड शालेय विभागीय हँडबॉल स्पर्धेसाठी झाली आहे. खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे व प्रा. रमजू शेख यांचे मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल विजयी  खेळाडूंचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे वेटलिफ्टिंग स्पर्धेत घवघवीत यश


उदगीर- कै. रसिका महाविद्यालय, देवणी येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन ब- विभाग वेटलिफ्टिंग (पुरुष) स्पर्धेत महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सक्रिय खेळ दाखवीत सुवर्ण -1, रौप्य- 3, कास्य- 2 एकूण 6 पदके पटकाविले आहेत. विनम्रसागर काळे - प्रथम (वजनगट 95 कि.ग्रॅ), शुभम राठोड - द्वितीय (वजन गट 75 कि.ग्रॅ), मंथन चांदणे - द्वितीय (वजन गट 70 कि.ग्रॅ), मोसीन शेख - द्वितीय (वजन गट 65 कि.ग्रॅ), रामेश्वर श्रीमंडळे - तृतीय (वजन गट 75 कि.ग्रॅ), अल्ताफ लदाफ - तृतीय (वजन गट 60 कि.ग्रॅ) या खेळाडूंचा समावेश होता. खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे व प्रा. रमजू शेख यांचे मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल विजयी खेळाडूंचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक विचारांची आजही गरज - प्रा. प्रवीण जाहूरे


उदगीर- महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त ‘कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक विचार आणि सद्यस्थिती’ या विषयावर हिंदी विभागातील प्रा. प्रवीण जाहूरे यांचे व्याख्यान प्राध्यापक प्रबोधिनीअंतर्गत आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना प्रा. प्रवीण जाहूरे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा आणि विचारांचा सविस्तर आढावा घेतला. रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेपूर्वीच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांवर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा प्रभाव होता. बहुजन समाजातील कुटुंबांमधील पहिल्या पिढीला शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना सुशिक्षित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. सन १९१९ मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली, तर संस्थेची नोंदणी १९३५ मध्ये झाली. लोकसहभागातून शिक्षणाची प्रक्रिया व्यापक व्हावी, या प्रेरणेतून कर्मवीरांनी समाजातील विविध घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी करून घेतले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनाही योग्य प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने त्यांनी अध्यापक विद्यालयाची स्थापना केली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून ‘मुष्टीदान योजनेच्या’ माध्यमातून अन्नधान्य जमा करून वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमातून शिक्षण हे केवळ शासन किंवा संस्थेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, हा विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून रुजविला. रयत शिक्षण संस्थेमुळे पश्चिम महाराष्ट्रात शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आणि त्याचा परिणाम त्या भागाच्या सामाजिक व आर्थिक विकासावरही झाला. शिक्षणाबरोबरच शेती, पशुपालन आणि श्रमाधारित प्रशिक्षण समाजासाठी आवश्यक आहे, हे ओळखून कर्मवीरांनी विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठेची भावना निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि वसतिगृहे यांच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातील विविध जिल्ह्यांतही शिक्षणाचा विस्तार केला. रयत शिक्षण संस्थेने केवळ विद्यार्थी घडविले नाहीत, तर शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक कर्तृत्ववान व्यक्तींनाही घडविले. त्यातील अनेकांनी पुढे विद्यापीठांच्या कुलगुरूपदांसह विविध महत्त्वाच्या शैक्षणिक पदांवर कार्य करून शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविला.
‘कमवा आणि शिका’ या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना काम करत शिक्षण घेण्याची संधी मिळाली. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच श्रमाची प्रतिष्ठा, स्वावलंबन आणि आर्थिक शिस्त यांचे महत्त्व समजले. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जीवनात यशस्वी झाले, असे प्रा. जाहूरे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. आर. के. मस्के म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा आणि त्यांनी केलेल्या कार्याचा समानार्थी शब्द म्हणजे ‘समर्पण’ होय. ‘शिक्षण हेच कर्म आणि सेवा हाच धर्म’ हा कर्मवीरांच्या आयुष्याचा मुख्य हेतू होता. त्यांच्या शैक्षणिक विचारांची आणि कार्याची प्रेरणा आजच्या पिढीसाठीही महत्त्वपूर्ण आहे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रबोधिनीचे प्रमुख प्रा. डॉ. बी. आर. दहिफळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. एस. आर. सोमवंशी यांनी मानले.

Thursday, September 17, 2026

संस्थापक प्राचार्य डॉ. ना. य. डोळे यांच्या प्रतिमेचे अनावरण


उदगीर-महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ. ना. य. डोळे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी महाविद्यालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्टाफ रूममध्ये त्यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा संपन्न झाला. प्राचार्य प्रा. डॉ. ना. य. डोळे यांनी आपल्या कार्यकाळात महाविद्यालयाच्या जडणघडणीत अत्यंत मोलाची भूमिका बजावली. महाविद्यालयाच्या शैक्षणिक, प्रशासकीय तसेच सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अनेक नवनवीन उपक्रम व प्रयोग राबविले. दूरदृष्टी, नावीन्यपूर्ण विचार आणि शैक्षणिक कार्याप्रती असलेल्या निष्ठेच्या बळावर त्यांनी महाविद्यालयाला विकासाच्या दिशेने पुढे नेत यशाच्या शिखरावर नेऊन ठेवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा आजही महाविद्यालयाच्या वाटचालीला प्रेरणा देणारा आहे, त्यांच्या कार्याची आठवण सदैव जिवंत राहावी तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्टाफ रूममध्ये त्यांची प्रतिमा लावण्यात आली. प्रतिमेच्या माध्यमातून संस्थापक प्राचार्यांच्या शैक्षणिक योगदानाचे स्मरण कायम राहून पुढील पिढीतील शिक्षकांना उत्कृष्ट कार्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, संस्था सदस्य अ‍ॅड. अजय दंडवते, डॉ. श्रीकांत मध्वरे, शिवराज वल्लापुरे, प्रा. आडेप्पा अंजुरे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, माजी प्राचार्य उमाटाळे, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थापक प्राचार्य डॉ. ना. य. डोळे यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या प्रेरणादायी स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला.

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात


उदगीर- महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज व विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहण करून झाली. यानंतर  प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राच्या सामाजिक व वैचारिक चळवळीतील त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात  चामले यांचा मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक म्हणून सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज अशा नूतन स्टाफ रूमचे उद्घाटन माजी प्राचार्य डॉ. उमाटाळे यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयात दीर्घकाळ सेवा बजावून निवृत्त झालेल्या प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी तसेच सेवकवर्गाचा यावेळी शाल व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या विकासात आणि जडणघडणीत योगदान देणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांप्रती यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. विद्यापीठाच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव प्रशांत पेन्सलवार यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम, त्याकाळातील तत्कालीन सामाजिक व राजकीय परिस्थिती तसेच स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या योगदानाविषयी सविस्तर माहिती दिली. मराठवाड्याच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देताना नव्या पिढीने या इतिहासातून प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने महाविद्यालय परिसरात 'वृक्षारोपणाचा कार्यक्रम' घेण्यात आला. उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मुक्तिसंग्रामाच्या स्मृतींसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नागनाथ खांडेकर यांनी केले, तर प्रा. डॉ. मुकेश कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया,  कोषाध्यक्ष महादेव नौबदे, संस्था सदस्य अ‍ॅड. अजय दंडवते,  डॉ. श्रीकांत मध्वरे, शिवराज वल्लापुरे, प्रा. आडेप्पा अंजुरे,  प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे  महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच मान्यवरांची उपस्थिती होती.

Wednesday, September 16, 2026

उदयगिरीच्या विद्यापीठ प्रतिनिधीपदी पठाण आसिया वसीम

 
उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी एम. ए. उर्दू प्रथम वर्गातील विद्यार्थिनी पठाण आसिया वसीम यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. त्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, प्रमुख पाहुणे अ‍ॅड.बसवराज पाटील कौळखेडकर, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रभारी प्रा. डॉ. एस. एन. लांडगे यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. याबद्दल विद्यापीठ प्रतिनिधी पठाण आसिया वसीम यांचे विद्यार्थी कल्याण मंडळाचे सदस्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Sunday, September 13, 2026

उदयगिरीत चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी


उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात बाराव्या शतकातील महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी करण्यात आली. पर्यावरण शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. जे. एम. पटवारी  यांच्या हस्ते चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, दिनविशेष समिती प्रमुख प्रा. डॉ. एम. जे. कुलकर्णी, प्रा. डॉ. जी. जी. जेवळीकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Friday, September 11, 2026

पीएसआय ए. के. मुल्ला यांचे ग्रंथालयात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन

 महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात पिंपरी चिंचवड पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत PSI A K MULLA यांनी ग्रंथालयात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे आणि ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार उपस्थित होते.

Thursday, September 10, 2026

उदयगिरीत आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धा संपन्न(लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांचा सहभाग)महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाने पटकाविले सांघिक विजेतेपद


उदगीर: (दि. 9 सप्टेंबर  2026) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर - विभागीय क्रॉस कंट्री /10 कि. मी. धावणे (पुरुष) आणि आंतर महाविद्यालयीन  क्रॉस कंट्री (महिला) स्पर्धा महाविद्यालय परिसरामध्ये संपन्न झाली. या स्पर्धेत विद्यापीठ परिक्षेत्रातील लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अ, ब, क, ड या 04 विभागातून 24 पुरुष खेळाडू तर 9 महाविद्यालयातून  26 महिला खेळाडूंनी सहभाग घेतला होता. याचबरोबर संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक व पंच यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रकाश तोंडारे तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे अधिसभा सदस्य ग्रंथपाल डॉ. विष्णू पवार हे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कोषाध्यक्ष महादेव नौबदे, क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष अजय दंडवते, पंचप्रमुख डॉ. सचिन चामले, निवड समिती सदस्य डॉ. आदित्य माने, निजाम शेख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे आदी उपस्थित होते. 
             या स्पर्धेचा अंतिम निकाल पुरुष गट- वैयक्तिक  प्रथम- प्रतीक पवार (संत जनाबाई महाविद्यालय, गंगाखेड), द्वितीय- वैभव तरंगे (श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी), तृतीय- माऊली सातपुते  (संत जनाबाई महाविद्यालय, गंगाखेड) तर सांघिक विजेतेपद अनुक्रमे प्रथम- डी झोन, द्वितीय- सी झोन, तृतीय- ए झोन याप्रमाणे यश संपादन केले.
            महिला गट - वैयक्तिक प्रथम- पुष्पा राठोड ( जयक्रांती महाविद्यालय, लातूर ) द्वितीय - स्वाती उगळे (श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी) तृतीय- वैष्णवी राठोड(महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर ) तर सांघिक विजेतेपद अनुक्रमे प्रथम- महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर, द्वितीय -  कै. रमेश वरपूडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनपेठ  याप्रमाणे यश संपादन केले. 
                या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच प्रा. डॉ. निहाल खान, डॉ. शिवानंद पाटील, प्रा. डॉ. डी.आर मुंडे, डॉ. पंडित प्रभाकर, लक्ष्मण सोनकांबळे, कु. सोनल उदबळे, वैभव अंभोरे, वीरसागर काळे, साईनाथ कांबळे, रोहन एनाडले, प्रा. शेख रमजू, रोहित कांबळे, प्रा. संजय बिबीनवरे, प्रताप भालेराव यांनी कामे पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांनी तर प्रास्ताविक व आभार क्रीडा संचालक प्रा.सतीश मुंढे यांनी केले.

Wednesday, September 9, 2026

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात डॉ. वर्गीस कुरियन यांना आदरांजली

 महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात दुग्धशास्त्र विभागात धवलक्रांतीचे प्रणेते डॉ. वर्गीस कुरियन यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, विभाग प्रमुख डॉ. एस. एन. लांडगे, डॉ. जयराज तोंडारे ,डॉ. भदाडे डॉ. ममदापूर, प्रा. विशाल रंगवाळ, प्रा. सौ. सुजाता गायकवाड आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विज्ञान शाखेतील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात विज्ञान शाखेतील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नव्याने महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना महाविद्यालयीन जीवनाची ओळख करून देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य राजकुमार मस्के होते. यावेळी विज्ञान शाखेतील प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वागत गीत साफिया शेख यांनी सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहीन सयदा व तांबोळी मुस्कान यांनी केले. त्यांनी कार्यक्रमातील विविध उपक्रमांचे सुंदर आणि प्रभावी पद्धतीने सूत्रसंचालन करून उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी प्राचार्य मस्के यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत महाविद्यालयीन जीवनात शैक्षणिक प्रगतीसोबतच विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी गौरवी भगवान बिरादार यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी व आयोजकांचे आभार मानले. 

Tuesday, September 8, 2026

उदयगिरीच्या दोन प्राध्यापकांना लॉयन्सचा ‘आदर्श शिक्षक’ सन्मान


उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागात अध्यापन कार्य करणारे प्रा. राहुल अशोकराव बिरादार आणि कनिष्ठ महाविद्यालयातील जीवशास्त्र विभागातील प्रा. शिल्पा गुरदाळे यांना ‘आदर्श शिक्षक सन्मानपत्र’ देऊन गौरविण्यात आले. लायन्स क्लब ऑफ उदगीर व उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय, उदगीर यांच्या संयुक्त सहकार्याने शिक्षक दिनानिमित्त हा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय व समर्पित कार्याची दखल घेत हे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.  उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय, उदगीर येथे झालेल्या कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. लायन्स क्लबच्या अध्यक्षा लायन्स सिमता लखोटिया, सचिव लायन्स रामकृष्ण बाहेती, कोषाध्यक्ष लायन्स तृप्ती मुंदडा, प्रोजेक्ट चेअरमन लायन्स बालाजी सोलापूरे तसेच लायन्स परिवाराच्या उपस्थितीत सन्मानपत्र देण्यात आले. त्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Monday, September 7, 2026

उदयगिरीत उमाजी नाईक यांची जयंती साजरी


उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यालयीन कर्मचारी भीमराव पाटील यांच्या हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार, दिनविशेष समिती प्रमुख प्रा. डॉ. एम. जे. कुलकर्णी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयास क्रॉस कंट्री (10 कि.मी. धावणे) स्पर्धेत विजेतेपद


उदगीर-  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय, उदगीर येथे आंतर महाविद्यालयीन ब- विभाग क्रॉस कंट्री (पुरुष) स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. वैयक्तिक स्पर्धेत गजानन जाधव प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सांघिक स्पर्धेत महाविद्यालयाचा संघाने विजेतेपद प्रथम क्रमांक पटकाविला आहे. विजेत्या संघामध्ये गजानन जाधव, बाळू राठोड, तानाजी लामतुरे, ऋषिकेश वाघमारे, नावेज अत्तार, श्रीधार केंद्रे या खेळाडूंचा समावेश होता. या विजयी खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे, प्रा. रमजू शेख यांनी मार्गदर्शन केले. त्याबद्दल विजेत्या खेळाडूंचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Saturday, September 5, 2026

उदयागिरीत शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार


उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यानंतर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये प्रा. डॉ. के. आर. गव्हाणे, प्रा. डॉ. एस. व्ही. आवाळे, प्रा. टी. एन. सगर, प्रा. डॉ. जैतून खुरेशी, प्रा. डॉ. व्ही. पी. चनाळे, रोखपाल आर. बी. देवर्षे आणि प्रयोगशाळा परिचर श्री. राजेंद्र बोनवळे यांचा समावेश होता.
यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच संस्थेचे सदस्य अ‍ॅड. अजय दंडवते, शिवराज वल्लापुरे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे उपस्थित होते. सत्कारमूर्तींच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक करून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही सत्कारमूर्तींचे अभिनंदन केले.

Tuesday, September 1, 2026

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे बॅडमिंटन स्पर्धेत घवघवीत यश पुरुष संघ – द्वितीय तर महिला संघ - तृतीय


उदगीर- स्वामी विवेकानंद महाविद्यालय, शिरूर ताजबंद येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन ब- विभाग बॅडमिंटन (पुरुष व महिला) स्पर्धेत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सक्रिय खेळ दाखवीत पुरुष संघाने द्वितीय क्रमांक तर महिला संघाने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. विजेत्या पुरुष संघामध्ये - संजयदत्तसिंह हजारी, गौरव पांचाळ, शुभम काटे, मांतेश स्वामी, अनिकेत देवणे, निरज मारेवार तर विजेत्या महिला संघामध्ये-  कु. वैष्णवी माने, कु. श्रध्दा सुवर्णकार, कु. सृष्टी गुंडरे, कु. आरती गडदे या खेळाडूंचा समावेश होता. खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे व प्रा. रमजू शेख यांचे मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल विजयी सर्व खेळाडूंचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

साहित्याचा अभ्यास व्यक्तीला नीतिमान बनवतो - प्रा. दायमी अब्दुल रहीम

उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी उर्दू वाङ्मय मंडळाचे उद्घाटन जमहूर कनिष्ठ महाविद्यालया...