उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सदस्य अरविंद पाटील एकंबेकर यांनी अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत आदरांजली वाहिली. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, दिनविशेष समितीचे प्रमुख डॉ. एम. एस. खांडेकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात अहिल्यादेवींच्या कार्यकौशल्याबद्दल संक्षिप्त माहिती देण्यात आली. प्रत्येक वर्षी अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्ताने अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट यश प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनी रोख रक्कम दोन हजार, शॉल, बुक आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचा संकल्प केला.
Sunday, May 31, 2026
Wednesday, May 27, 2026
महाराष्ट्र उदयगिरीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी
उदगीर (28 मे 2026) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव प्रशांत पेन्सलवार यांनी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, दिनविशेष समितीचे प्रमुख डॉ. एम. एस. खांडेकर तसेच शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Tuesday, May 26, 2026
कला शाखेतून करिअरची नवी दिशा; स्नेहल गायकवाड यांची प्रोजेक्ट मॅनेजरपदी भरारी
उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील कला शाखेतील माजी विद्यार्थिनी कु. स्नेहल गायकवाड हिची बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन, पुणे या स्वयंसेवी संस्थेमध्ये प्रकल्प व्यवस्थापक पदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य डॉ.श्रीकांत मध्वरे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य एस. जी. कोडचे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना स्नेहल गायकवाड म्हणाली, माझ्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे, इथून मिळालेले ज्ञान व संस्काराच्या बळावर आयुष्याची यशस्वी वाटचाल झाल्याचे सांगितले. यावेळी नागराळकर म्हणाले विद्यार्थ्यांनी विद्याशाखेचा न्यूनगंड न बाळगता प्रयत्न केल्यास मोठ्या पदावर संधी मिळते हा आदर्श ठेवून वाटचाल करावी अशी अपेक्षा व्यक्त करून स्नेहलच्या पुढील वाटचालीसाठी संस्था व महाविद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कु. स्नेहल गायकवाड ही कला शाखेची विद्यार्थिनी असून तिने आपल्या मेहनत, चिकाटी आणि गुणवत्तेच्या बळावर हे यश संपादन केले आहे. तिच्या निवडीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. या यशाबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Thursday, May 21, 2026
महाराष्ट्र उदयगिरीत राजीव गांधी यांना अभिवादन
उदगीर (21 मे 2026) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात भारताची माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. एस. जी. कोडचे यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रा. डॉ. एम. एस. खांडेकर यांनी उपस्थित त्यांना दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनाची शपथ दिली. प्रा. प्रवीण जाहुरे यांनी राजीव गांधी यांच्या पंतप्रधान पदीच्या कार्यकाळातील कार्याची माहिती उपस्थितांना सांगितली. यावेळी प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
Thursday, May 14, 2026
महाराष्ट्र उदयगिरीत छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी
उदगीर (14 मे 2026) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सदस्य प्रा. आडेप्पा अंजुरे यांनी संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. जी. कोडचे, ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार, दिनविशेष समितीचे प्रमुख डॉ. एम. एस. खांडेकर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
Saturday, May 2, 2026
उदयगिरी महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 94.63 टक्के; विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
उदगीर : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील फेब्रुवारी 2026 परीक्षेतील बारावीच्या विविध शाखांच्या निकालामध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून एकूण निकाल प्रति वर्षाप्रमाणे उत्कृष्ट ठरला आहे.
महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेने 95.63 टक्के निकालाची नोंद केली असून या शाखेत एकूण 275 विद्यार्थ्यांपैकी 263 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 6 विद्यार्थी विशेष प्राविण्य तर 38 विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
कला शाखेचा निकाल 96.87 टक्के इतका उत्कृष्ट लागला असून 32 पैकी 31 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये 1 विद्यार्थी विशेष प्राविण्य तर 8 विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
वाणिज्य शाखेने 89.39 टक्के निकाल मिळवला असून 66 पैकी 59 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 11 विद्यार्थी विशेष प्राविण्य तर 12 विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
एकूण महाविद्यालयाचा निकाल 94.63 टक्के लागला आहे. एकूण 373 विद्यार्थ्यांपैकी 353 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी 18 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, तर 58 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या सातत्यपूर्ण परिश्रम, अभ्यासू वृत्ती आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, उपप्राचार्य एस. जी. कोडचे, पर्यवेक्षक प्रा. एस. व्ही. मूडपे, प्रा. टी. एन. सगर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. या निकालामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा जोपासली गेली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
उदयगिरीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. महाराष्ट...
-
उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात समता सप्ताह अंतर्गत ‘महात्मा बसवेश्वरांचे द्रष्टेपण’ विषयावर प्रेरणादायी व्याख्यान...
-
उदगीर - महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी महेश महादप्पा मुद्दा यांची बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया च्या उपाध्यक्ष...
-
उदगीर : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील फेब्रुवारी 2026 परीक्षेतील बारावीच्या विविध शाखांच्या निकालामध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश सं...