उदगीर : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील फेब्रुवारी 2026 परीक्षेतील बारावीच्या विविध शाखांच्या निकालामध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून एकूण निकाल प्रति वर्षाप्रमाणे उत्कृष्ट ठरला आहे.
महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेने 95.63 टक्के निकालाची नोंद केली असून या शाखेत एकूण 275 विद्यार्थ्यांपैकी 263 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 6 विद्यार्थी विशेष प्राविण्य तर 38 विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
कला शाखेचा निकाल 96.87 टक्के इतका उत्कृष्ट लागला असून 32 पैकी 31 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये 1 विद्यार्थी विशेष प्राविण्य तर 8 विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
वाणिज्य शाखेने 89.39 टक्के निकाल मिळवला असून 66 पैकी 59 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 11 विद्यार्थी विशेष प्राविण्य तर 12 विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
एकूण महाविद्यालयाचा निकाल 94.63 टक्के लागला आहे. एकूण 373 विद्यार्थ्यांपैकी 353 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी 18 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, तर 58 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या सातत्यपूर्ण परिश्रम, अभ्यासू वृत्ती आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, उपप्राचार्य एस. जी. कोडचे, पर्यवेक्षक प्रा. एस. व्ही. मूडपे, प्रा. टी. एन. सगर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. या निकालामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा जोपासली गेली आहे.
No comments:
Post a Comment