Sunday, October 18, 2026
साहित्याचा अभ्यास व्यक्तीला नीतिमान बनवतो - प्रा. दायमी अब्दुल रहीम
Thursday, October 15, 2026
भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती निमित्त वाचन प्रेरणा व व्हाईट केन सेफ्टी दिन साजरा
Wednesday, October 14, 2026
राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी महाराष्ट्र उदयगिरीच्या मुलींची निवड 4 बाय 400 मीटर रिले संघ - प्रथम
Monday, October 12, 2026
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात सेवा गौरव सोहळा संपन्न
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने नवरात्री निमित्त ‘नऊ रंग, नऊ पुस्तके’ ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
उदगीर : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी नवरात्री निमित्त 'नऊ रंग, नऊ पुस्तके’ या अभिनव संकल्पनेवर आधारित ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील पुस्तकांची ओळख करून देण्याबरोबरच वाचनाची आवड निर्माण करणे आणि ज्ञानाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या ग्रंथप्रदर्शनामध्ये नऊ रंगांच्या संकल्पनेतून विविध विषयांवरील पुस्तकांचे आकर्षक पद्धतीने प्रदर्शन करण्यात आले. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांच्या हस्ते झाले. या नाविन्यपूर्ण ग्रंथप्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी घेतला.
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मतदान जनजागृती अभियान
Friday, October 9, 2026
जिल्हास्तरीय आविष्कार २०२६ संशोधन स्पर्धेत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना द्वितीय क्रमांक
Sunday, October 4, 2026
उदयगिरीत आंतर महाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धा संपन्न(उदयगिरीच्या महिला संघाला सर्वसाधारण विजेतेपद)
Saturday, October 3, 2026
महाराष्ट्र उदयगिरी कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्यपदी तिरुपती सगर, पर्यवेक्षकपदी संजय मुडपे यांची नियुक्ती
Friday, October 2, 2026
उदयगिरीत गांधीजी शास्त्रीजी जयंती विविध उपक्रमांनी साजरी
Thursday, October 1, 2026
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात वाङ्मय मंडळाचे उद्घाटन व लेखन प्रेरणा दिन स्पर्धेचा निकाल जाहीर
उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि कन्नड वाङ्मय मंडळाचे उद्घाटन नुकतेच उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. स्मिता नागोरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार, प्रा. डॉ. बी. एस. भुक्तरे, प्रा. डॉ. एस. एम. सूर्यवंशी, प्रा. डॉ. रमेश मुलगे आणि प्रा. डॉ. कुरेशी जैतून बानू यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रमेश मुलगे यांनी केले. आपल्या मार्गदर्शनात प्रा. डॉ. नागोरी यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यक्तिमत्व स्वतः घडवले पाहिजे, अपयशासाठी इतरांना दोष देऊ नये आणि जीवनातील ताण-तणावाचे व्यवस्थापन करता आले पाहिजे. साहित्य हे मनुष्याला जीवनाची योग्य दिशा दाखवते, त्यामुळे त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवनंदा रोडगे यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. पुष्पलता काळे यांनी मानले.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लेखन प्रेरणा दिन निबंध स्पर्धेचा निकालही यावेळी जाहीर करण्यात आला. वरिष्ठ महाविद्यालय विभागात मराठी विषयात एम.ए. प्रथम वर्षाचा विद्यार्थी फड संतोष दत्ता याने प्रथम क्रमांक पटकावला, तर इंग्रजी विषयात बी.ए. द्वितीय वर्षाची शेख नुसरत हिला द्वितीय क्रमांक मिळाला. उर्दू विषयात बी.एस्सी. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी सय्यदा माहीन तलात लाईक साब हिने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच कन्नड आणि हिंदी विषयात तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला असून त्यात बी.एस्सी. द्वितीय वर्षाची तांबोळी स्नेहा शिवाजी हिने कन्नडसाठी आणि बी.एस्सी. तृतीय वर्षाची मुस्कान मौलासाब तांबोळी हिने हिंदीसाठी पारितोषिक पटकावले. कनिष्ठ महाविद्यालय विभागात इंग्रजी विषयात ११ वी विज्ञानची सय्यद अयेशा रब्बानी हिने प्रथम, मराठी विषयात ११ वी विज्ञानची स्वामी मैथिली मनमथ हिने द्वितीय तर उर्दू विषयात ११ वीचा सय्यद मुजम्मिल लायक साब याने तृतीय क्रमांक पटकावला. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनाने विद्यार्थ्यांमध्ये साहित्यिक उत्साह
साहित्याचा अभ्यास व्यक्तीला नीतिमान बनवतो - प्रा. दायमी अब्दुल रहीम
उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी उर्दू वाङ्मय मंडळाचे उद्घाटन जमहूर कनिष्ठ महाविद्यालया...
-
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि लातूर उपकेंद्राच्या अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार २०२६ रिस...
-
महात्मा गांधी यांच्या विचारांवर आधारित परिसंवादात मान्यवरांनी सत्य, अहिंसा व मानवतेची मूल्ये आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे...
