उदगीर- दिनांक 14 ऑक्टोबर 2026 रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव आणि उस्मानाबाद जिल्हा ॲमॅच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय आंतर शालेय मैदानी स्पर्धा तुळजाभवानी स्टेडियम, धाराशिव येथे संपन्न झाल्या. स्पर्धेत महाराष्ट्र उदयगिरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी 19 वर्षाखालील मुलींच्या गटात घवघवीत यश संपादन केले आहे. स्पर्धेत कु. अर्चना राठोड हिने 800 मीटर धावणे, 1500 मीटर धावणे आणि 4 कि.मी. क्रॉस कंट्री या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. तर कु. तनवी वाडकर हिने 100 मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला, तसेच 4 बाय 400 मीटर रिले संघाने प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरासाठी निवड निश्चित केली आहे. या विजयी रिले संघामध्ये कु. अर्चना राठोड, कु. तनवी वाडकर, कु. इंदुमती नामवाड, कु. पल्लवी जाधव आणि कु. अंतरा मोरे या खेळाडूंचा समावेश होता. या सर्व विजयी खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे व प्रा. रमजू शेख यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे,. उपप्राचार्य टी. एन. सगर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
साहित्याचा अभ्यास व्यक्तीला नीतिमान बनवतो - प्रा. दायमी अब्दुल रहीम
उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी उर्दू वाङ्मय मंडळाचे उद्घाटन जमहूर कनिष्ठ महाविद्यालया...
-
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि लातूर उपकेंद्राच्या अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार २०२६ रिस...
-
महात्मा गांधी यांच्या विचारांवर आधारित परिसंवादात मान्यवरांनी सत्य, अहिंसा व मानवतेची मूल्ये आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे...
No comments:
Post a Comment