उदगीर- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि लातूर उपकेंद्राच्या अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार २०२६ रिसर्च फेस्टिवल मध्ये महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथील संगणकशास्त्र विभागाच्या कु. सानिया मिर्झा आणि कु. प्राजक्ता श्रीमंगले या विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे. विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धेत दोन्ही विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि संशोधनविषयक कार्याची उज्ज्वल परंपरा अधोरेखित झाली आहे. यशस्वी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणाऱ्या संगणकशास्त्र विभागातील प्राध्यापक प्रा. डॉ. एस. व्ही. आवाळे, प्रा. राहुल बिरादार आणि आविष्कार रिसर्च फेस्टिवलचे टीम लीडर प्रा. डॉ. व्ही. एस. नागपूर्णे व प्रा. डॉ. आर. बी. अलापुरे यांचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
साहित्याचा अभ्यास व्यक्तीला नीतिमान बनवतो - प्रा. दायमी अब्दुल रहीम
उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी उर्दू वाङ्मय मंडळाचे उद्घाटन जमहूर कनिष्ठ महाविद्यालया...
-
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि लातूर उपकेंद्राच्या अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार २०२६ रिस...
-
महात्मा गांधी यांच्या विचारांवर आधारित परिसंवादात मान्यवरांनी सत्य, अहिंसा व मानवतेची मूल्ये आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे...
No comments:
Post a Comment