Monday, October 12, 2026

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मतदान जनजागृती अभियान


उदगीर- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे  राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमास राजश्री भोसले, नायब तहसीलदार, उदगीर, शेख शफी कासीमसाब, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती उदगीर, अंजली स्वामी गट प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व, लोकशाही व्यवस्थेतील मतदारांची भूमिका आणि मतदानाचा हक्क व जबाबदारी याविषयी राजश्री भोसले यांनी मार्गदर्शन केले. शेख शफी कासीमसाब यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार जागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. अंजली स्वामी गट यांनी मतदान जनजागृतीची शपथ देवून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी अध्यक्षीय भाषणात मतदान हा केवळ अधिकार नसून लोकशाही प्रती असलेली जबाबदारी आहे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. बालाजी होकरणे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. बी. डी. करंडे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

साहित्याचा अभ्यास व्यक्तीला नीतिमान बनवतो - प्रा. दायमी अब्दुल रहीम

उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी उर्दू वाङ्मय मंडळाचे उद्घाटन जमहूर कनिष्ठ महाविद्यालया...