Monday, October 12, 2026

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने नवरात्री निमित्त ‘नऊ रंग, नऊ पुस्तके’ ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

उदगीर : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी नवरात्री निमित्त 'नऊ रंग, नऊ पुस्तके’ या अभिनव संकल्पनेवर आधारित ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील पुस्तकांची ओळख करून देण्याबरोबरच वाचनाची आवड निर्माण करणे आणि ज्ञानाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या ग्रंथप्रदर्शनामध्ये नऊ रंगांच्या संकल्पनेतून विविध विषयांवरील पुस्तकांचे आकर्षक पद्धतीने प्रदर्शन करण्यात आले. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांच्या हस्ते झाले. या नाविन्यपूर्ण ग्रंथप्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी,  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी घेतला.


No comments:

Post a Comment

साहित्याचा अभ्यास व्यक्तीला नीतिमान बनवतो - प्रा. दायमी अब्दुल रहीम

उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी उर्दू वाङ्मय मंडळाचे उद्घाटन जमहूर कनिष्ठ महाविद्यालया...