उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यानंतर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये प्रा. डॉ. के. आर. गव्हाणे, प्रा. डॉ. एस. व्ही. आवाळे, प्रा. टी. एन. सगर, प्रा. डॉ. जैतून खुरेशी, प्रा. डॉ. व्ही. पी. चनाळे, रोखपाल आर. बी. देवर्षे आणि प्रयोगशाळा परिचर श्री. राजेंद्र बोनवळे यांचा समावेश होता.
यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच संस्थेचे सदस्य अॅड. अजय दंडवते, शिवराज वल्लापुरे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे उपस्थित होते. सत्कारमूर्तींच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक करून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही सत्कारमूर्तींचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment