उदगीर- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय, उदगीर येथे आंतर महाविद्यालयीन ब- विभाग क्रॉस कंट्री (पुरुष) स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. वैयक्तिक स्पर्धेत गजानन जाधव प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सांघिक स्पर्धेत महाविद्यालयाचा संघाने विजेतेपद प्रथम क्रमांक पटकाविला आहे. विजेत्या संघामध्ये गजानन जाधव, बाळू राठोड, तानाजी लामतुरे, ऋषिकेश वाघमारे, नावेज अत्तार, श्रीधार केंद्रे या खेळाडूंचा समावेश होता. या विजयी खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे, प्रा. रमजू शेख यांनी मार्गदर्शन केले. त्याबद्दल विजेत्या खेळाडूंचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
उदयगिरीत उमाजी नाईक यांची जयंती साजरी
उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आल...
-
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात विविध कार...
-
उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात समता सप्ताह अंतर्गत ‘महात्मा बसवेश्वरांचे द्रष्टेपण’ विषयावर प्रेरणादायी व्याख्यान...
No comments:
Post a Comment