Saturday, August 29, 2026

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या वैष्णवी राठोडचे मॅरेथॉन स्पर्धेत यश


उदगीर- दि. 29 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागामार्फत आयोजित खुली मॅरेथॉन (6 कि.मी. धावणे)  स्पर्धेत महाविद्यालयाच्या पुरुष आणि महिला खेळाडूंनी सक्रिय सहभाग नोंदविला. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या कु. वैष्णवी राठोड हिने विद्यापीठात सर्व तृतीय क्रमांक पटकाविला, यावेळी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख 2001 रुपये बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. विजयी खेळाडूचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Friday, August 21, 2026

उदयागिरीत सुधाकरराव नाईक जयंतीनिमित्त जलसंधारण व मृदा संवर्धन शपथ


उदगीर- महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात महाराष्ट्राचे अकरावे मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकर नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसेच जलसंधारण सप्ताहाचे औचित्य साधून महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी  सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. बी. एस. कांबळे तसेच ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी सामूहिक जलसंधारण व मृदा संवर्धनाची शपथ घेतली. जलसंधारण व मृदा संवर्धन या विषयावर निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत बी.एस्सी. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी कु. उर्मिला व्यंकट बिरादार आणि कु. स्नेहा परमेश्वर घोनशेट्टे यांनी विजेतेपद मिळविले. विजेत्यांना शैक्षणिक साहित्य, रजिस्टर व पेन देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमासाठी पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी यांनी पुढाकार घेतला. जलसंधारण, मृदा संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

Thursday, August 20, 2026

एनसीसीच्या वतीने विद्यार्थ्यांना आर्मी भरतीबाबत मार्गदर्शनआर्मी भरतीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शारीरिक चाचणी


एनसीसी बटालियन, लातूर येथील पीआय स्टाफ सुभेदार देशराज सिंग यादव व हवालदार नरेंद्र सिंग यांनी आज महाविद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांना आर्मी भरती प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणीही घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. आर. के. मस्के यांनी बटालियनहून आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मार्गदर्शन कार्यक्रमात महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे सर्व छात्र सैनिक, एनसीसी कंपनीचे कंपनी कमांडर कॅप्टन डॉ. राम साबदे तसेच क्रीडा संचालक प्रा. सतीश मुंडे उपस्थित होते. उदगीर शहरातील शिवाजी महाविद्यालयातील एनसीसी छात्र सैनिकांनीही या कार्यक्रमास उपस्थिती लावली. आर्मी भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता, तयारी, भरती प्रक्रिया व आवश्यक बाबींबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा उत्स्फूर्त सहभाग घेत लाभ घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना संरक्षण दलातील करिअरच्या संधींबाबत प्रेरणा मिळावी आणि त्यांना भरतीसाठी योग्य दिशा मिळावी, हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

उदयगिरीत सद्भावना दिन साजरा

 उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमांतर्गत राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. बी. एस. होकरणे, प्रा. डॉ. एन. डी. वगशेट्टी, दिनविशेष समितीचे प्रा. डॉ. एम. जे. कुलकर्णी, ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार, स्टाफ सेक्रेटरी डॉ. बी. एस. कांबळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सद्भावना दिनाची शपथ देण्यात आली. जात, धर्म, भाषा यांमध्ये कोणताही भेदभाव न करता राष्ट्रीय एकात्मता, बंधुता, सौहार्द आणि सामाजिक ऐक्याची भावना जपण्याचा संकल्प करण्यात आला. राजीव गांधी यांच्या आधुनिक, वैज्ञानिक आणि प्रगत भारताच्या विचारांना स्मरण करून विद्यार्थ्यांनी देशाच्या विकासासाठी सकारात्मक योगदान देण्याचा निर्धार केला.

Tuesday, August 18, 2026

उदयगिरीत नशा मुक्त मोहिमेचा कार्यक्रम यशस्वी


उदगीर — प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आणि महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने व मिशन स्पंदन (भारत सरकार) यांच्या अंतर्गत आज महाविद्यालयात नशा मुक्त भारत अभियानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ब्रह्मकुमारी महानंदा दिदी या होत्या, यावेळी प्रमुख पाहुण्या ब्रह्मकुमारी महानंदा दिदी यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्त जीवनाचे महत्त्व स्पष्ट करत शपथ घेण्यास प्रेरित केले. त्यांनी नशा नाकारून आरोग्यदायी, शिस्तबद्ध आणि सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्याचे मार्गदर्शन केले आणि युवकांना स्वतःच्या भविष्यासाठी जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी  नशामुक्तीचे सामाजिक व शैक्षणिक फायदे अधोरेखित केले आणि शैक्षणिक संस्थांसमवेत सामाजिक स्तरावरही अशा मोहिमांना हातभार लावण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राहुल आलापुरे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. प्रशांत वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  विनोद आष्टुरे, ब्रह्मकुमारी उषा दिदी, नितीन भाई व इतर अनेक सहकाऱ्यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले.

Sunday, August 16, 2026

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा

उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करून करण्यात आली. या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सर्व सदस्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी  उपस्थित राहून राष्ट्रगान, राष्ट्रगीत आणि राज्य गीत गायले. ध्वजारोहनानंतर प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत आयोजित व्याख्यानाचे प्रा. डॉ. कमलाकर गव्हाणे यांनी "आजचे शिक्षण, लोकशाही मूल्य आणि सजग नागरिकत्व" या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. डॉ. गव्हाणे म्हणाले की, लोकशाहीची मूळ मूल्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिक्षणातूनच रूढ होणे आवश्यक आहे. शैक्षणिक ज्ञान नव्हे, तर लोकशाही मूल्यांची जाणीव आणि समाजात सजग नागरिकत्व निर्माण करणे हे प्राध्यापकांचे मुख्य कर्तव्य आहे.
डॉ. गव्हाणे यांनी पुढे सांगितले की भारतीय लोकशाही प्रातिनिधिक असून विविधतेत एकता हा तिचा मुख्य आधार आहे. मतदारांनी त्यांच्या लोकप्रतिनिधींवर सतत दबाव ठेवला पाहिजे, तरच पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित होऊ शकते. त्यांनी नागरिकांनी आपल्या हक्काबरोबरच जबाबदाऱ्या देखील पाळाव्यात, असे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की लोकशाही यशस्वी होण्यासाठी शिक्षणाचे प्रमाण आणि गुणवत्तेत वाढ करणे आवश्यक आहे, तसेच नागरिकांनी मतदान आणि सामुदायिक सहभागासारख्या प्रक्रियांकडे जबाबदारीने पाहावे. यावेळी मंचावर अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर आणि सहसचिव प्रशांत पेन्सलवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. बी. आर. दहिफळे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. बी. एस. भुक्तरे यांनी मानले.

Thursday, August 13, 2026

उदयगिरीचा बुद्धिबळ संघाची नऊ वर्षापासून विजेतेपदाची परंपरा कायम


उदगीर- वसंतराव नाईक अध्यापक महाविद्यालय, शिरूर ताजबंद येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन ब- विभाग बुद्धिबळ (पुरुष) स्पर्धेत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सक्रिय खेळ दाखवीत ‘विजेतेपद’ (प्रथम क्रमांक) पटकावला. विजेतेपदामुळे बुद्धिबळ संघाची नऊ वर्षापासून विजेतेपदाची परंपरा कायम राखली गेली. विजेत्या संघामध्ये नंदन जाधव, प्रितम पाटील, रितेश कांबळे, सुरज कदम, बालाजी कॅदरकुंटे, प्रद्युम्न जंपावाड या खेळाडूंचा समावेश होता. खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे व प्रा. रमजू शेख यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर यांच्या हस्ते संघातील यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या विजयामुळे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, प्रा.महेश बसपूरे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

राष्ट्रीय एकतेचा संदेश देत उदयागिरीची तिरंगा पदयात्रा


उदगीर— महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात उत्साहवर्धक तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली. या पदयात्रेमध्ये राष्ट्रीय छात्र सेना (सर्व छात्र सैनिक) आणि एन.एस.एस. चे विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.
पदयात्रेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांच्या हस्ते हिरवा ध्वज दाखवून करण्यात आले. तिरंगा पदयात्रा महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयापासून सुरू होऊन सोमनाथपूर परिसरात समाप्त झाली. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ध्वजांची गौरवपूर्ती करत शांततापूर्ण आणि सुव्यवस्थित वातावरणात मार्गक्रमण केले. पदयात्रा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेचे कमांडर डॉ. आर. पी. साबदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. बी. एस. होकरणे,  प्रा. डॉ. एन. डी. वगशेट्टी,  प्रा. डॉ. एस. व्ही. भद्रशेट्टे यांनी प्रयत्न केले.

Wednesday, August 12, 2026

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती उत्साहात साजरी


उदगीर- भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची 134 वी जयंती महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाला ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार, ग्रंथालय समितीचे सदस्य, ग्रंथालयातील कर्मचारी, प्राध्यापक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय विभागाने विशेष परिश्रम घेतले.

Monday, August 10, 2026

संजय बनसोडे यांच्या शुभहस्ते उदयगिरी महाविद्यालयात "एक कर्मचारी एक वृक्ष" मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण व हवामान गुणवत्ता डिस्प्ले चे उद्घाटन


उदगीर — नेहमीच पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी पुढे असणाऱ्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील पर्यावरण शास्त्र विभागातर्फे आज खास वृक्षारोपण व हवामान गुणवत्ता डिस्प्ले उद्घाटन आयोजित करण्यात आले. अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांच्या प्रेरणेने आणि प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी यांच्या प्रयत्नाने "एक कर्मचारी एक वृक्ष" या मोहिमेअंतर्गत झालेल्या कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्राचे माजी मंत्री व सध्याचे आमदार संजय बनसोडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 
कार्यक्रमात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे आणि संस्था सदस्य माजी अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, शिवराज वल्लापुरे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, सर्व शिक्षक‑शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय बनसोडे म्हणाले पर्यावरण संवर्धनाच्या महत्त्वावर भर देत, शैक्षणिक संस्थांनी पर्यावरणीय जबाबदारी घेणे गरजेचे असल्याचे अधोरेखित केले, महाविद्यालयाने राबवलेला हा उपक्रम अतिशय प्रेरणा देणार आहे. कार्यक्रमात शिक्षक व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या वृक्षारोपण केले. अध्यक्षीय समारोपात बसवराज पाटील यांनी रोपांची काळजी कशी घेतली जाईल आणि पाणी व्यवस्थापन कसे केले आहे याबाबत माहिती दिली. याशिवाय महाविद्यालयात नवीन हवामान व वायु‑गुणवत्ता डिस्प्ले प्रणाली स्थापित करण्यात आली. या प्रणालीद्वारे परिसरातील, तापमान, आर्द्रता अशा मापनांचे वास्तविक वेळेतील आकडे प्रदर्शनावर दिसतील, ज्यामुळे  परिसरातील शेतकऱ्यांना हवेची स्थिती समजून घेण्यास तसेच नागरिकांना आरोग्य संबंधित खबरदारी घेण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. बी. एस. कांबळे यांनी तर आभार प्रा. डॉ. आर. बी. आलापुरे यांनी मानले.

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात विद्यार्थी-पालक-शिक्षक संवाद बैठक संपन्न


उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी-पालक-शिक्षक संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य अ‍ॅड. अजय दंडवते, भीमाशंकर मुद्दा, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, पर्यवेक्षक प्रा. संजय मुडपे, पर्यवेक्षक प्रा. तिरुपती सगर तसेच पालक प्रतिनिधी जावेद बशिरुद्दीन शेख यांची उपस्थिती होती. यावेळी पालक प्रतिनिधी जावेद बशिरुद्दीन शेख आणि कांचन मोरे यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच एमएच-सीईटी आणि पूर्वज्ञान चाचणीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते ग्रंथभेट व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. परीक्षेसाठी उत्कृष्ट प्रश्नसंच तयार करणारे प्रा. शैलेश बिरादार, प्रा. संदीप मजगे, प्रा. अश्विन वळवी आणि प्रा. प्रवीण जाहुरे यांचाही ग्रंथभेट व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया म्हणाले की, अकरावीच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक सुविधा आणि उपक्रमांचा पुरेपूर लाभ घ्यावा.
अध्यक्षीय समारोपात बसवराज पाटील नागराळकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी जीवनाचा आनंद घेत अभ्यास करावा. पालकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण करून त्यांना सातत्याने प्रोत्साहन द्यावे. विद्यार्थ्यांनी केवळ घोकंपट्टी न करता विषयातील संकल्पना समजून घेऊन अभ्यास करावा आणि यशाचा संकल्प करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान ड्रोन तंत्रज्ञानाविषयी माहिती व प्रात्यक्षिके डॉ. के. नाईक, पी. कांबळे, डॉ. सुरेंद्र आणि डॉ. शेख यांनी सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. संजय मुडपे यांनी केले. प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून अकरावी व बारावीच्या दोन वर्षांच्या कालावधीचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. नागनाथ खांडेकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. प्रवीण जाहुरे यांनी केले, तर आभार प्रा. प्रसाद जालनापुरकर यांनी मानले.

Sunday, August 2, 2026

उदयगिरीत क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी


उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात स्वातंत्र्य लढ्यातील थोर सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष महादेव नौबदे यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार, दिनविशेष समिती प्रमुख प्रा. डॉ. एम. जे. कुलकर्णी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Saturday, August 1, 2026

आंबेडकरी विचारांचे खरे पाईक अण्णाभाऊ साठे- प्रा. डॉ. गजानन मंदावाड


उदगीर- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. सकाळच्या सत्रात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, दिनविशेष समिती प्रमुख प्रा. डॉ. एम. जे. कुलकर्णी, स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. बंकट कांबळे तसेच प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. लेखन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे आयोजित ग्रंथप्रदर्शनासही भरभरून प्रतिसाद मिळाला. ग्रंथप्रदर्शनात अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले निवडक साहित्य, त्यांच्या साहित्याच्या समीक्षा-चरित्राचा समावेश होता. विद्यार्थी, प्राध्यापक आणि संस्थेचे सदस्य ग्रंथप्रदर्शनाला भेट देत वाचनाचा आनंद घेतला.
दुपारच्या सत्रात प्रा. मंदावाड यांनी आंबेडकरी विचार, साहित्य आणि सामाजिक चळवळींचा आढावा घेतला. अण्णा भाऊ साठे यांच्या विस्तृत साहित्याकृत्या (35 कादंबरी, शेकडो कथा, प्रवासवर्णने, लोकनाट्ये) ला त्यांनी आंबेडकरी विचारांचा महत्त्वाचा आधार मानले. साठे यांच्या कथांच्या नायका समाजातील अन्यायाची लढाई लढणारे दाखवले आहेत; त्यांच्या लेखनातून मिल कामगार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळींचे प्रतिबिंब दिसते. टिळकांविषयी मंदावाड म्हणाले की त्यांनी शैक्षणिक चळवळ (न्यू इंग्लिश शाळा, डेक्कन एज्युकेशन सोसायटी), केशरी–मराठा माध्यमातून राजकीय आघाडी घेतली, होमरुल व स्वराज्य-स्वदेशीचा प्रचार केला आणि अनेकदा तुरुंगवास भोगला. त्यांनी टिळक, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांमधील साम्य–असम्य मुद्दे उलगडले. प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी साठे यांच्या साहित्यात जातीधर्माच्या भिंती मोडून समाजकार्य करण्याचा संदेश असल्याचे म्हटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जी. जी. जेवळीकर यांनी केले; आभारप्रदर्शन प्रा. डॉ. एम. जे. कुलकर्णी यांनी केले.

उदयागिरीत शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार

उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...