Monday, August 10, 2026

संजय बनसोडे यांच्या शुभहस्ते उदयगिरी महाविद्यालयात "एक कर्मचारी एक वृक्ष" मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण व हवामान गुणवत्ता डिस्प्ले चे उद्घाटन


उदगीर — नेहमीच पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी पुढे असणाऱ्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील पर्यावरण शास्त्र विभागातर्फे आज खास वृक्षारोपण व हवामान गुणवत्ता डिस्प्ले उद्घाटन आयोजित करण्यात आले. अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांच्या प्रेरणेने आणि प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी यांच्या प्रयत्नाने "एक कर्मचारी एक वृक्ष" या मोहिमेअंतर्गत झालेल्या कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्राचे माजी मंत्री व सध्याचे आमदार संजय बनसोडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 
कार्यक्रमात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे आणि संस्था सदस्य माजी अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, शिवराज वल्लापुरे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, सर्व शिक्षक‑शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय बनसोडे म्हणाले पर्यावरण संवर्धनाच्या महत्त्वावर भर देत, शैक्षणिक संस्थांनी पर्यावरणीय जबाबदारी घेणे गरजेचे असल्याचे अधोरेखित केले, महाविद्यालयाने राबवलेला हा उपक्रम अतिशय प्रेरणा देणार आहे. कार्यक्रमात शिक्षक व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या वृक्षारोपण केले. अध्यक्षीय समारोपात बसवराज पाटील यांनी रोपांची काळजी कशी घेतली जाईल आणि पाणी व्यवस्थापन कसे केले आहे याबाबत माहिती दिली. याशिवाय महाविद्यालयात नवीन हवामान व वायु‑गुणवत्ता डिस्प्ले प्रणाली स्थापित करण्यात आली. या प्रणालीद्वारे परिसरातील, तापमान, आर्द्रता अशा मापनांचे वास्तविक वेळेतील आकडे प्रदर्शनावर दिसतील, ज्यामुळे  परिसरातील शेतकऱ्यांना हवेची स्थिती समजून घेण्यास तसेच नागरिकांना आरोग्य संबंधित खबरदारी घेण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. बी. एस. कांबळे यांनी तर आभार प्रा. डॉ. आर. बी. आलापुरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

उदयागिरीत शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार

उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...