Monday, June 29, 2026

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात कबीर जयंती उत्साहात साजरी

 

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने सोमवार, दि. 29 जून 2026 रोजी संत, समाजसुधारक व महान कवी संत कबीर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. शैलेष ममदापूरे, प्रा. डॉ. तोंडारे तसेच हिंदी विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. विनोद चनाले यांनी संत कबीर यांच्या जीवनकार्य व साहित्याचा आढावा घेताना सांगितले की, संत कबीर यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी सामान्य माणूस आहे. त्यांनी आयुष्यभर समाजातील रूढी, अंधश्रद्धा व कालबाह्य परंपरांचा विरोध करून समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांचे विचार आजही समाजाला दिशादर्शक ठरत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. बलिराम भुकतरे यांनी केले.

Friday, June 26, 2026

उदयगिरी महाविद्यालयात शाहू महाराज यांची जयंती साजरी


उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, सहसचिव प्रशांत पेन्सलवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अनेकांनी शाहू महाराजांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या यामध्ये प्रा. डॉ. दहिफळे म्हणाले, सामाजिक परिवर्तनाचे जनक छत्रपती शाहू महाराज होते, प्रा. डॉ. बी. एस. भुक्‍तरे यांनी शाहू महाराजांनी आंबेडकरांना दलितांची कैवारी म्हणून सर्वासमक्ष मान्यता दिली याची माहिती दिली. सहसचिव प्रशांत पेन्सलवार यांनी सांगितले की, शाहू महाराज यांनी सर्वप्रथम सर्व जाती धर्मांना समान शिक्षणाची योजना अमलात आणली, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी शाहू महाराजांच्या आरक्षण चळवळी विषयी उपस्थितांना संबोधित केले, प्रा. डॉ. एम. जे. कुलकर्णी यांनी शाहू महाराजांच्या कार्यकाळात दिलेल्या शिष्यवृत्ती विषयी माहिती सांगितली. यावेळी उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, पर्यवेक्षक एस. व्ही. मूडपे, स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. बंकट कांबळे आणि प्रा. नागनाथ खांडेकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Wednesday, June 24, 2026

उदयगिरीच्या स्टाफ सेक्रेटरी पदी प्रा.कांबळे आणि प्रा.खांडेकर यांची निवड

उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालया च्या स्टाफ सेक्रेटरी पदी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. बंकट कांबळे तसेच रसायनशास्त्र विभागातील प्रा. नागनाथ खांडेकर यांची निवड करण्यात आली. दोघांनाही मागील वर्षीचे स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. अर्चना मोरे आणि प्रा. सरस्वती येडले यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Sunday, June 21, 2026

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात योगदिन उत्साहात साजरा

उदगीर — महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात क्रीडा विभाग, राष्ट्रीय छात्रसेना व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने  बारावा योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे मार्गदर्शन योगगुरू शंकरराव चापोलीकर यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी योगगुरूंचे औपचारिक स्वागत केले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी  प्राध्यापक, राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी, खेळाडू व शिक्षकेतर कर्मचारी  मोठ्या संख्येने उपस्थित राहून योगाभ्यासात भाग घेतला. विविध शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त अशा आसने, श्वासोच्छ्वासाचे व्यायाम व ध्यानाचे मार्गदर्शन योगगुरूंनी उपस्थितांना केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय छात्रसेनेचे कमांडर प्रा. डॉ. राम साबदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. बालाजी होकरणें, प्रा. डॉ. एन. डी. वगशेट्टी, प्रा. डॉ. सुनंदा भद्रशेट्टे, क्रीडा संचालक सतीश मुंढे, रमजू शेख यांनी कार्य केले.

Thursday, June 18, 2026

माजी विद्यार्थी ओझर सरफराज मलकजी यांचा उदयगिरी महाविद्यालयात सत्कार

माजी विद्यार्थी ओझर सरफराज मलकजी यांचा उदयगिरी महाविद्यालयात सत्कार

उदगीर : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी ओझर सरफराज मलकजी याची हैदराबाद येथील सेल्सफोर्स कंपनीत निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व ग्रंथ भेट देऊन हा सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, पर्यवेक्षक प्रा. संजय मुडपेप्रा. तिरुपती सगर उपस्थित होते. ओझर सरफराज मलकजी याने बारावीचे शिक्षण महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात पूर्ण केले असून संगणकशास्त्र विषयात आयआयटी, धनबाद येथून पदवी शिक्षण घेतले आहे. महाविद्यालयीन काळात कोणत्याही प्रकारची शिकवणी न लावता केवळ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन व नियमित अभ्यास केल्यामुळे हे यश मिळाल्याचे त्याने सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययनाला प्राधान्य देऊन नियमित तासिकांना उपस्थित राहावे, असा संदेशही त्याने दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नागनाथ खांडेकर यांनी केले.


Wednesday, June 17, 2026

उदयगिरीत महाराणा प्रताप यांची जयंती साजरी


उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, दिनविशेष समितीचे प्रमुख डॉ. एम. एस. खांडेकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Friday, June 5, 2026

उदयगिरी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

 

उदगीर- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य शिवराज वल्लापूरे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जे. एम. पटवारी, डॉ. आर. बी. अलापूरे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हरित पर्यावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी वृक्षांचे महत्त्व, वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. तसेच प्लास्टिकमुक्त परिसर, जलसंवर्धन आणि स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात आली.

उदयगिरी महाविद्यालयात अजितदादा पवार यांची जयंती साजरी

उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली. महा...