महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने सोमवार, दि. 29 जून 2026 रोजी संत, समाजसुधारक व महान कवी संत कबीर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. शैलेष ममदापूरे, प्रा. डॉ. तोंडारे तसेच हिंदी विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. विनोद चनाले यांनी संत कबीर यांच्या जीवनकार्य व साहित्याचा आढावा घेताना सांगितले की, संत कबीर यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी सामान्य माणूस आहे. त्यांनी आयुष्यभर समाजातील रूढी, अंधश्रद्धा व कालबाह्य परंपरांचा विरोध करून समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांचे विचार आजही समाजाला दिशादर्शक ठरत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. बलिराम भुकतरे यांनी केले.

No comments:
Post a Comment