Wednesday, July 1, 2026

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात वसंतराव नाईक जयंती उत्साहात साजरी


उदगीर : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे शिल्पकार व शेतकऱ्यांचे हितचिंतक वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त महाविद्यालय परिसरात ‘उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे व तहसीलदार राम बोरगावकर’ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अधिकाधिक वृक्ष लागवड व संवर्धन करण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर हे होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी आपल्या भाषणात वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा, कृषी विकासासाठी राबविलेल्या योजनांचा तसेच जलसंधारण, ग्रामीण विकास आणि हरित क्रांतीतील त्यांच्या योगदानाचा गौरव केला. तहसीलदार राम बोरगावकर यांनीही वसंतराव नाईक यांच्या लोकाभिमुख प्रशासनाची आणि शेतकरी हिताच्या धोरणांची माहिती देत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी प्रा. मनोहर समगर यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी केले, अध्यक्षीय समारोप बसवराज पाटील नागराळकर यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्टाफ सेक्रेटरी नागनाथ खांडेकर यांनी केले तर प्रा. डॉ. मुकेश कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच संस्था सदस्य अ‍ॅड.अजय दंडवते, शिवराज वल्लापुरे, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

उदयागिरीत शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार

उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...