उदगीर : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) 2026 मध्ये महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेची कामगिरी करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी भर घातली आहे. या परीक्षेत वायचळे संस्कृती हिने 98.45 पर्सेंटाइल मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शिवपूजा कोरे हिने 98.29 पर्सेंटाइल मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला, तर वट्टमवार प्रांजली हिने 97.37 पर्सेंटाइल मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. महाविद्यालयातील 15 विद्यार्थ्यांनी 90 पर्सेंटाइलपेक्षा अधिक गुण मिळविले असून 18 विद्यार्थ्यांनी 80 पर्सेंटाइलपेक्षा अधिक गुण संपादन केले आहेत. या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. या यशाबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, समन्वयक प्रा. एस. जी. कोडचे, पर्यवेक्षक प्रा. एस. व्ही. मुडपे आणि प्रा. टी. एन. सगर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Subscribe to:
Post Comments (Atom)
उदयागिरीत शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात विविध कार...
-
उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात समता सप्ताह अंतर्गत ‘महात्मा बसवेश्वरांचे द्रष्टेपण’ विषयावर प्रेरणादायी व्याख्यान...
No comments:
Post a Comment