Saturday, September 5, 2026

उदयागिरीत शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार


उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यानंतर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये प्रा. डॉ. के. आर. गव्हाणे, प्रा. डॉ. एस. व्ही. आवाळे, प्रा. टी. एन. सगर, प्रा. डॉ. जैतून खुरेशी, प्रा. डॉ. व्ही. पी. चनाळे, रोखपाल आर. बी. देवर्षे आणि प्रयोगशाळा परिचर श्री. राजेंद्र बोनवळे यांचा समावेश होता.
यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच संस्थेचे सदस्य अ‍ॅड. अजय दंडवते, शिवराज वल्लापुरे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे उपस्थित होते. सत्कारमूर्तींच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक करून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही सत्कारमूर्तींचे अभिनंदन केले.

Tuesday, September 1, 2026

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे बॅडमिंटन स्पर्धेत घवघवीत यश पुरुष संघ – द्वितीय तर महिला संघ - तृतीय


उदगीर- स्वामी विवेकानंद महाविद्यालय, शिरूर ताजबंद येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन ब- विभाग बॅडमिंटन (पुरुष व महिला) स्पर्धेत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सक्रिय खेळ दाखवीत पुरुष संघाने द्वितीय क्रमांक तर महिला संघाने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. विजेत्या पुरुष संघामध्ये - संजयदत्तसिंह हजारी, गौरव पांचाळ, शुभम काटे, मांतेश स्वामी, अनिकेत देवणे, निरज मारेवार तर विजेत्या महिला संघामध्ये-  कु. वैष्णवी माने, कु. श्रध्दा सुवर्णकार, कु. सृष्टी गुंडरे, कु. आरती गडदे या खेळाडूंचा समावेश होता. खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे व प्रा. रमजू शेख यांचे मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल विजयी सर्व खेळाडूंचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Saturday, August 29, 2026

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या वैष्णवी राठोडचे मॅरेथॉन स्पर्धेत यश


उदगीर- दि. 29 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागामार्फत आयोजित खुली मॅरेथॉन (6 कि.मी. धावणे)  स्पर्धेत महाविद्यालयाच्या पुरुष आणि महिला खेळाडूंनी सक्रिय सहभाग नोंदविला. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या कु. वैष्णवी राठोड हिने विद्यापीठात सर्व तृतीय क्रमांक पटकाविला, यावेळी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख 2001 रुपये बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. विजयी खेळाडूचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Friday, August 21, 2026

उदयागिरीत सुधाकरराव नाईक जयंतीनिमित्त जलसंधारण व मृदा संवर्धन शपथ


उदगीर- महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात महाराष्ट्राचे अकरावे मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकर नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसेच जलसंधारण सप्ताहाचे औचित्य साधून महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी  सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. बी. एस. कांबळे तसेच ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी सामूहिक जलसंधारण व मृदा संवर्धनाची शपथ घेतली. जलसंधारण व मृदा संवर्धन या विषयावर निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत बी.एस्सी. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी कु. उर्मिला व्यंकट बिरादार आणि कु. स्नेहा परमेश्वर घोनशेट्टे यांनी विजेतेपद मिळविले. विजेत्यांना शैक्षणिक साहित्य, रजिस्टर व पेन देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमासाठी पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी यांनी पुढाकार घेतला. जलसंधारण, मृदा संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

Thursday, August 20, 2026

एनसीसीच्या वतीने विद्यार्थ्यांना आर्मी भरतीबाबत मार्गदर्शनआर्मी भरतीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शारीरिक चाचणी


एनसीसी बटालियन, लातूर येथील पीआय स्टाफ सुभेदार देशराज सिंग यादव व हवालदार नरेंद्र सिंग यांनी आज महाविद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांना आर्मी भरती प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणीही घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. आर. के. मस्के यांनी बटालियनहून आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मार्गदर्शन कार्यक्रमात महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे सर्व छात्र सैनिक, एनसीसी कंपनीचे कंपनी कमांडर कॅप्टन डॉ. राम साबदे तसेच क्रीडा संचालक प्रा. सतीश मुंडे उपस्थित होते. उदगीर शहरातील शिवाजी महाविद्यालयातील एनसीसी छात्र सैनिकांनीही या कार्यक्रमास उपस्थिती लावली. आर्मी भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता, तयारी, भरती प्रक्रिया व आवश्यक बाबींबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा उत्स्फूर्त सहभाग घेत लाभ घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना संरक्षण दलातील करिअरच्या संधींबाबत प्रेरणा मिळावी आणि त्यांना भरतीसाठी योग्य दिशा मिळावी, हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

उदयगिरीत सद्भावना दिन साजरा

 उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमांतर्गत राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. बी. एस. होकरणे, प्रा. डॉ. एन. डी. वगशेट्टी, दिनविशेष समितीचे प्रा. डॉ. एम. जे. कुलकर्णी, ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार, स्टाफ सेक्रेटरी डॉ. बी. एस. कांबळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सद्भावना दिनाची शपथ देण्यात आली. जात, धर्म, भाषा यांमध्ये कोणताही भेदभाव न करता राष्ट्रीय एकात्मता, बंधुता, सौहार्द आणि सामाजिक ऐक्याची भावना जपण्याचा संकल्प करण्यात आला. राजीव गांधी यांच्या आधुनिक, वैज्ञानिक आणि प्रगत भारताच्या विचारांना स्मरण करून विद्यार्थ्यांनी देशाच्या विकासासाठी सकारात्मक योगदान देण्याचा निर्धार केला.

Tuesday, August 18, 2026

उदयगिरीत नशा मुक्त मोहिमेचा कार्यक्रम यशस्वी


उदगीर — प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आणि महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने व मिशन स्पंदन (भारत सरकार) यांच्या अंतर्गत आज महाविद्यालयात नशा मुक्त भारत अभियानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ब्रह्मकुमारी महानंदा दिदी या होत्या, यावेळी प्रमुख पाहुण्या ब्रह्मकुमारी महानंदा दिदी यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्त जीवनाचे महत्त्व स्पष्ट करत शपथ घेण्यास प्रेरित केले. त्यांनी नशा नाकारून आरोग्यदायी, शिस्तबद्ध आणि सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्याचे मार्गदर्शन केले आणि युवकांना स्वतःच्या भविष्यासाठी जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी  नशामुक्तीचे सामाजिक व शैक्षणिक फायदे अधोरेखित केले आणि शैक्षणिक संस्थांसमवेत सामाजिक स्तरावरही अशा मोहिमांना हातभार लावण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राहुल आलापुरे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. प्रशांत वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  विनोद आष्टुरे, ब्रह्मकुमारी उषा दिदी, नितीन भाई व इतर अनेक सहकाऱ्यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले.

उदयागिरीत शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार

उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...