उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचा सेवा गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. यामध्ये भौतिकशास्त्र विभागातील प्रा. डॉ. व्ही. पी. पवार, उर्दू विभागातील प्रा. डॉ. हमीद अश्रफ, एमसीव्हीसी विभागातील प्रा. गोपाळ पाटील आणि प्रयोगशाळा परिचर दिलीप होळकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व सेवानिवृत्तांचा शाल, बुके आणि स्मृतिचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, संस्था सदस्य शिवराज वल्लापुरे, प्रा. आडेप्पा अंजुरे, डॉ. श्रीकांत मध्वरे, श्रीमती भाग्यश्री चाकूरकर, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला. तसेच आविष्कार रिसर्च फेस्टिवल अंतर्गत सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नागनाथ खांडेकर व आभार प्रा. डॉ. बंकट कांबळे यांनी मानले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
साहित्याचा अभ्यास व्यक्तीला नीतिमान बनवतो - प्रा. दायमी अब्दुल रहीम
उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी उर्दू वाङ्मय मंडळाचे उद्घाटन जमहूर कनिष्ठ महाविद्यालया...
-
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि लातूर उपकेंद्राच्या अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार २०२६ रिस...
-
महात्मा गांधी यांच्या विचारांवर आधारित परिसंवादात मान्यवरांनी सत्य, अहिंसा व मानवतेची मूल्ये आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे...
No comments:
Post a Comment