उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी उर्दू वाङ्मय मंडळाचे उद्घाटन जमहूर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. दायमी अब्दुल रहीम यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी बोलताना ते म्हणाले साहित्य मग ते कोणत्याही भाषेतील असो ते व्यक्तीला नीतिमान बनवते व समाजात जगण्यासाठी लागणारी ऊर्जा देते, वाङ्मय मंडळाच्या प्रमुखपदी लदाफ नोमान यांची निवड करण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के होते तर यावेळी ग्रंथपाल डॉ. एल.बी. पेन्सलवार, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. एस.एम. सूर्यवंशी उपस्थित होते, यावेळी प्राचार्य डॉ. मस्के यांनी विद्यार्थ्यांना उर्दू सोबत इतर भाषांचाही अभ्यास करण्याचे आवाहन केले, तर डॉ. पेन्सलवार यांनी ग्रंथालयातील ग्रंथांबरोबरच स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक साहित्याचाही अभ्यास करावा अशी अपेक्षा व्यक्त केली, यावेळी उर्दू विभागाच्या 'फिक्र-ए-नौ' या वार्षिक अंकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले असून संपादक मंडळात पठाण इरशाद, पठाण असिया, कोतवाल आमिना, सदाफ, हाश्मी जुबेर आणि कुरेशी अर्सलान यांनी कार्य केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. कुरेशी जैतून बानो, प्रा. डॉ. मसिउल्लाह रशदी, प्रा. फरेहा तन्वीर व प्रा. कुरेशी जहाँ आरा यांनी परिश्रम घेतले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
साहित्याचा अभ्यास व्यक्तीला नीतिमान बनवतो - प्रा. दायमी अब्दुल रहीम
उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी उर्दू वाङ्मय मंडळाचे उद्घाटन जमहूर कनिष्ठ महाविद्यालया...
-
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि लातूर उपकेंद्राच्या अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार २०२६ रिस...
-
महात्मा गांधी यांच्या विचारांवर आधारित परिसंवादात मान्यवरांनी सत्य, अहिंसा व मानवतेची मूल्ये आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे...
No comments:
Post a Comment