उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात समता सप्ताह अंतर्गत ‘महात्मा बसवेश्वरांचे द्रष्टेपण’ विषयावर प्रेरणादायी व्याख्यान संपन्न झाले, व्याख्यानाचा विषय विषय “महात्मा बसवेश्वर यांचे द्रष्टेपण” असा होता. या प्रसंगी प्रमुख वक्ते प्रा. शिवहार स्वामी फुलवळकर यांनी मार्गदर्शन केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर होते. कार्यक्रमाला उपाध्यक्ष प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, कार्यकारणी सदस्य शिवराज वल्लापुरे यांची उपस्थिती लाभली. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. हमीद अश्रफ यांनी केले, तर आभार ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार यांनी मानले. यावेळी बोलताना प्रा. फुलवळकर यांनी महापुरुषांचे विचार हे काळाच्या पलीकडे जाऊन मानवकल्याणाचा मार्ग दाखवतात, असे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अहिल्याबाई होळकर यांसारख्या महापुरुषांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी समाजातील समतेचे महत्त्व अधोरेखित केले. बाराव्या शतकातील महात्मा बसवेश्वर यांनी समता, बंधुता आणि श्रमप्रतिष्ठेचा संदेश दिला. “कायक वे कैलास” या तत्त्वातून त्यांनी कोणतेही काम लहान नसल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांनी स्थापन केलेले ‘अनुभव मंडप’ हे जगातील पहिले लोकशाही व्यासपीठ मानले जाते, जिथे सर्व जाती-धर्मातील लोकांना आणि स्त्रियांनाही समान सहभागाची संधी होती. अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय आणि दासोह अंतर्गत शिल्लक संपत्तीचे योग्य वाटप यांसारख्या मूल्यांचा पुरस्कार करत बसवेश्वरांनी समाजाला प्रगत दिशादर्शन केले. आजच्या काळातही त्यांचे विचार अत्यंत उपयुक्त असून समाजाने ते आत्मसात करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समोर बसवराज पाटील म्हणाले महात्मा बसवेश्वर आजच्या समाजासाठी समाज दिशादर्शक म्हणून गरजेचे आहेत त्यांच्या प्रत्येक विचारात समाजाला समानतेची दिशा मिळते. कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक तसेच कार्यालयीन व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
उदयागिरीत शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात विविध कार...
-
उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात समता सप्ताह अंतर्गत ‘महात्मा बसवेश्वरांचे द्रष्टेपण’ विषयावर प्रेरणादायी व्याख्यान...
No comments:
Post a Comment