उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, सहसचिव प्रशांत पेन्सलवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अनेकांनी शाहू महाराजांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या यामध्ये प्रा. डॉ. दहिफळे म्हणाले, सामाजिक परिवर्तनाचे जनक छत्रपती शाहू महाराज होते, प्रा. डॉ. बी. एस. भुक्तरे यांनी शाहू महाराजांनी आंबेडकरांना दलितांची कैवारी म्हणून सर्वासमक्ष मान्यता दिली याची माहिती दिली. सहसचिव प्रशांत पेन्सलवार यांनी सांगितले की, शाहू महाराज यांनी सर्वप्रथम सर्व जाती धर्मांना समान शिक्षणाची योजना अमलात आणली, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी शाहू महाराजांच्या आरक्षण चळवळी विषयी उपस्थितांना संबोधित केले, प्रा. डॉ. एम. जे. कुलकर्णी यांनी शाहू महाराजांच्या कार्यकाळात दिलेल्या शिष्यवृत्ती विषयी माहिती सांगितली. यावेळी उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, पर्यवेक्षक एस. व्ही. मूडपे, स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. बंकट कांबळे आणि प्रा. नागनाथ खांडेकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
उदयागिरीत शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात विविध कार...
-
उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात समता सप्ताह अंतर्गत ‘महात्मा बसवेश्वरांचे द्रष्टेपण’ विषयावर प्रेरणादायी व्याख्यान...
No comments:
Post a Comment