एनसीसी बटालियन, लातूर येथील पीआय स्टाफ सुभेदार देशराज सिंग यादव व हवालदार नरेंद्र सिंग यांनी आज महाविद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांना आर्मी भरती प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणीही घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. आर. के. मस्के यांनी बटालियनहून आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मार्गदर्शन कार्यक्रमात महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे सर्व छात्र सैनिक, एनसीसी कंपनीचे कंपनी कमांडर कॅप्टन डॉ. राम साबदे तसेच क्रीडा संचालक प्रा. सतीश मुंडे उपस्थित होते. उदगीर शहरातील शिवाजी महाविद्यालयातील एनसीसी छात्र सैनिकांनीही या कार्यक्रमास उपस्थिती लावली. आर्मी भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता, तयारी, भरती प्रक्रिया व आवश्यक बाबींबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा उत्स्फूर्त सहभाग घेत लाभ घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना संरक्षण दलातील करिअरच्या संधींबाबत प्रेरणा मिळावी आणि त्यांना भरतीसाठी योग्य दिशा मिळावी, हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
Subscribe to:
Post Comments (Atom)
साहित्याचा अभ्यास व्यक्तीला नीतिमान बनवतो - प्रा. दायमी अब्दुल रहीम
उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी उर्दू वाङ्मय मंडळाचे उद्घाटन जमहूर कनिष्ठ महाविद्यालया...
-
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि लातूर उपकेंद्राच्या अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार २०२६ रिस...
-
महात्मा गांधी यांच्या विचारांवर आधारित परिसंवादात मान्यवरांनी सत्य, अहिंसा व मानवतेची मूल्ये आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे...
No comments:
Post a Comment