उदगीर- महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात महाराष्ट्राचे अकरावे मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकर नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसेच जलसंधारण सप्ताहाचे औचित्य साधून महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. बी. एस. कांबळे तसेच ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी सामूहिक जलसंधारण व मृदा संवर्धनाची शपथ घेतली. जलसंधारण व मृदा संवर्धन या विषयावर निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत बी.एस्सी. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी कु. उर्मिला व्यंकट बिरादार आणि कु. स्नेहा परमेश्वर घोनशेट्टे यांनी विजेतेपद मिळविले. विजेत्यांना शैक्षणिक साहित्य, रजिस्टर व पेन देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमासाठी पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी यांनी पुढाकार घेतला. जलसंधारण, मृदा संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
उदयागिरीत शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात विविध कार...
-
उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात समता सप्ताह अंतर्गत ‘महात्मा बसवेश्वरांचे द्रष्टेपण’ विषयावर प्रेरणादायी व्याख्यान...
No comments:
Post a Comment