Sunday, August 16, 2026

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा

उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करून करण्यात आली. या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सर्व सदस्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी  उपस्थित राहून राष्ट्रगान, राष्ट्रगीत आणि राज्य गीत गायले. ध्वजारोहनानंतर प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत आयोजित व्याख्यानाचे प्रा. डॉ. कमलाकर गव्हाणे यांनी "आजचे शिक्षण, लोकशाही मूल्य आणि सजग नागरिकत्व" या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. डॉ. गव्हाणे म्हणाले की, लोकशाहीची मूळ मूल्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिक्षणातूनच रूढ होणे आवश्यक आहे. शैक्षणिक ज्ञान नव्हे, तर लोकशाही मूल्यांची जाणीव आणि समाजात सजग नागरिकत्व निर्माण करणे हे प्राध्यापकांचे मुख्य कर्तव्य आहे.
डॉ. गव्हाणे यांनी पुढे सांगितले की भारतीय लोकशाही प्रातिनिधिक असून विविधतेत एकता हा तिचा मुख्य आधार आहे. मतदारांनी त्यांच्या लोकप्रतिनिधींवर सतत दबाव ठेवला पाहिजे, तरच पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित होऊ शकते. त्यांनी नागरिकांनी आपल्या हक्काबरोबरच जबाबदाऱ्या देखील पाळाव्यात, असे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की लोकशाही यशस्वी होण्यासाठी शिक्षणाचे प्रमाण आणि गुणवत्तेत वाढ करणे आवश्यक आहे, तसेच नागरिकांनी मतदान आणि सामुदायिक सहभागासारख्या प्रक्रियांकडे जबाबदारीने पाहावे. यावेळी मंचावर अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर आणि सहसचिव प्रशांत पेन्सलवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. बी. आर. दहिफळे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. बी. एस. भुक्तरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

उदयागिरीत शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार

उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...