उदगीर — प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आणि महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने व मिशन स्पंदन (भारत सरकार) यांच्या अंतर्गत आज महाविद्यालयात नशा मुक्त भारत अभियानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ब्रह्मकुमारी महानंदा दिदी या होत्या, यावेळी प्रमुख पाहुण्या ब्रह्मकुमारी महानंदा दिदी यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्त जीवनाचे महत्त्व स्पष्ट करत शपथ घेण्यास प्रेरित केले. त्यांनी नशा नाकारून आरोग्यदायी, शिस्तबद्ध आणि सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्याचे मार्गदर्शन केले आणि युवकांना स्वतःच्या भविष्यासाठी जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी नशामुक्तीचे सामाजिक व शैक्षणिक फायदे अधोरेखित केले आणि शैक्षणिक संस्थांसमवेत सामाजिक स्तरावरही अशा मोहिमांना हातभार लावण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राहुल आलापुरे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. प्रशांत वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद आष्टुरे, ब्रह्मकुमारी उषा दिदी, नितीन भाई व इतर अनेक सहकाऱ्यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
उदयागिरीत शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात विविध कार...
-
उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात समता सप्ताह अंतर्गत ‘महात्मा बसवेश्वरांचे द्रष्टेपण’ विषयावर प्रेरणादायी व्याख्यान...
No comments:
Post a Comment