उदगीर- वसंतराव नाईक अध्यापक महाविद्यालय, शिरूर ताजबंद येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन ब- विभाग बुद्धिबळ (पुरुष) स्पर्धेत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सक्रिय खेळ दाखवीत ‘विजेतेपद’ (प्रथम क्रमांक) पटकावला. विजेतेपदामुळे बुद्धिबळ संघाची नऊ वर्षापासून विजेतेपदाची परंपरा कायम राखली गेली. विजेत्या संघामध्ये नंदन जाधव, प्रितम पाटील, रितेश कांबळे, सुरज कदम, बालाजी कॅदरकुंटे, प्रद्युम्न जंपावाड या खेळाडूंचा समावेश होता. खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे व प्रा. रमजू शेख यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर यांच्या हस्ते संघातील यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या विजयामुळे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, प्रा.महेश बसपूरे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
उदयागिरीत शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात विविध कार...
-
उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात समता सप्ताह अंतर्गत ‘महात्मा बसवेश्वरांचे द्रष्टेपण’ विषयावर प्रेरणादायी व्याख्यान...
No comments:
Post a Comment