उदगीर- स्वामी विवेकानंद महाविद्यालय, शिरूर ताजबंद येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन ब- विभाग बॅडमिंटन (पुरुष व महिला) स्पर्धेत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सक्रिय खेळ दाखवीत पुरुष संघाने द्वितीय क्रमांक तर महिला संघाने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. विजेत्या पुरुष संघामध्ये - संजयदत्तसिंह हजारी, गौरव पांचाळ, शुभम काटे, मांतेश स्वामी, अनिकेत देवणे, निरज मारेवार तर विजेत्या महिला संघामध्ये- कु. वैष्णवी माने, कु. श्रध्दा सुवर्णकार, कु. सृष्टी गुंडरे, कु. आरती गडदे या खेळाडूंचा समावेश होता. खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे व प्रा. रमजू शेख यांचे मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल विजयी सर्व खेळाडूंचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
उदयागिरीत शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात विविध कार...
-
उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात समता सप्ताह अंतर्गत ‘महात्मा बसवेश्वरांचे द्रष्टेपण’ विषयावर प्रेरणादायी व्याख्यान...
No comments:
Post a Comment