Sunday, October 4, 2026

उदयगिरीत आंतर महाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धा संपन्न(उदयगिरीच्या महिला संघाला सर्वसाधारण विजेतेपद)


उदगीर:(दि. 3 व 4 ऑक्टोबर 2026) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ब’ विभाग आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धा (ॲथलेटिक्स) पुरुष – महिला महाविद्यालयाच्या 400 मीटर ट्रॅकवर संपन्न झाली. या स्पर्धेत  'ब' विभागाशी संलग्नित 21 महाविद्यालयातील 155 पुरुष तर  110 महिला एकूण 265 खेळाडूंनी सक्रिय सहभाग घेतला. याचबरोबर संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक व पंच म्हणून 80 व्यक्तींनी सहभाग नोंदविला आहे. सदर स्पर्धेत पुरुष-महिलांचे 33 क्रीडा प्रकारात सुवर्ण, रौप्य व कांस्य असे 150 पदकांचे वितरण करण्यात आले. 
स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश चामले, संस्थेचे सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य ॲड. अजय दंडवते, अडेप्पा अंजुरे, क्रीडा संकुल समिती सदस्य निजाम शेख, ब-विभागाचे सचिव डॉ. अभिजित मोरे, निवड समिती सदस्य डॉ. सचिन चामले, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, डॉ. गौरव जेवळीकर, क्रीडा संचालक प्रा. सतीश मुंढे, प्रा. रमजू शेख आदी उपस्थित होते.
या स्पर्धेचा अंतिम निकाल सर्वसाधारण विजेतेपद पुरुष- महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर तर सर्वसाधारण विजेतेपद महिला- महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर याप्रमाणे यश संपादन केले. 
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी व पंच म्हणून प्रा. निहाल खान, डॉ. डी.आर मुंडे, डॉ. तातेराव  केंद्रे, डॉ.  गोविंद कलवले, डॉ. जयदीप कहाळेकर, डॉ.  दिलीप काळे, संतोष कोले, प्रा. सचिन चौधरी, सोनल उदबळे, रमेश सूर्यवंशी, रोहन एनाडले, प्रा. शेख रमजू, प्रा. संजय बिबीनवरे, प्रताप भालेराव यांनी कामे पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. गौरव जेवळीकर तर प्रास्ताविक व आभार क्रीडा संचालक प्रा.सतीश मुंढे यांनी केले.

No comments:

Post a Comment

साहित्याचा अभ्यास व्यक्तीला नीतिमान बनवतो - प्रा. दायमी अब्दुल रहीम

उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी उर्दू वाङ्मय मंडळाचे उद्घाटन जमहूर कनिष्ठ महाविद्यालया...