Thursday, October 1, 2026

मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनाने विद्यार्थ्यांमध्ये साहित्यिक उत्साह


​उदगीर: येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन सुप्रसिद्ध कवयित्री वर्षाराणी मुस्कावाड यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले. या प्रसंगी त्यांनी केलेल्या प्रभावी काव्यगायनाने उपस्थितांची मने जिंकली.
​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के हे होते. व्यासपीठावर मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार, समन्वयक डॉ. बी. आर. दहिफळे, डॉ. ए. पी. मोरे, सहसमन्वयक डॉ. के. एस. भदाडे, प्रा. शिवाजी काळे, प्रा. विनायक बोनवळे, वाङ्मय मंडळाच्या अध्यक्षा संध्या जमादार आणि मंडळाचे प्रमुख डॉ. रमेश मुलगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
​प्रस्ताविकात मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार यांनी वाङ्मय मंडळाच्या उपक्रमांची रूपरेषा मांडली. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य देत साहित्यिक, सांस्कृतिक व सामाजिक जाणीवा समृद्ध करणारे उपक्रम राबवले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. संवेदनशीलता, सर्जनशीलता आणि सामाजिक भान निर्माण करून 'चांगला माणूस घडवणे' हेच या मंडळाचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
​अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी विद्यार्थ्यांना जीवनात वात्सल्य, आपुलकी आणि स्नेहाची भावना जपण्याचा सल्ला दिला. महाविद्यालयातून संस्कारसंपन्न व निकोप विचारांचे विद्यार्थी घडले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पूजा कुलकर्णी यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय कु. संध्या जमादार यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार कु. अंकिता दंडीमे यांनी मानले. सुप्रसिद्ध कीर्तनकार कु. ज्ञानेश्वरी सुरनर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
​हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कु. पायल मुदाळे, कु. पौर्णिमा गायकवाड, कु. अस्मिता सूर्यवंशी, सानिया पठाण, अस्मिता गोटमुखले, कु. संतोषी कोरनुळे, संध्याराणी गोटमुखले व वाङ्मय मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

साहित्याचा अभ्यास व्यक्तीला नीतिमान बनवतो - प्रा. दायमी अब्दुल रहीम

उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी उर्दू वाङ्मय मंडळाचे उद्घाटन जमहूर कनिष्ठ महाविद्यालया...