उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील कला शाखेतील माजी विद्यार्थिनी कु. स्नेहल गायकवाड हिची बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन, पुणे या स्वयंसेवी संस्थेमध्ये प्रकल्प व्यवस्थापक पदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य डॉ.श्रीकांत मध्वरे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य एस. जी. कोडचे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना स्नेहल गायकवाड म्हणाली, माझ्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे, इथून मिळालेले ज्ञान व संस्काराच्या बळावर आयुष्याची यशस्वी वाटचाल झाल्याचे सांगितले. यावेळी नागराळकर म्हणाले विद्यार्थ्यांनी विद्याशाखेचा न्यूनगंड न बाळगता प्रयत्न केल्यास मोठ्या पदावर संधी मिळते हा आदर्श ठेवून वाटचाल करावी अशी अपेक्षा व्यक्त करून स्नेहलच्या पुढील वाटचालीसाठी संस्था व महाविद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कु. स्नेहल गायकवाड ही कला शाखेची विद्यार्थिनी असून तिने आपल्या मेहनत, चिकाटी आणि गुणवत्तेच्या बळावर हे यश संपादन केले आहे. तिच्या निवडीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. या यशाबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Subscribe to:
Post Comments (Atom)
उदयागिरीत शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात विविध कार...
-
उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात समता सप्ताह अंतर्गत ‘महात्मा बसवेश्वरांचे द्रष्टेपण’ विषयावर प्रेरणादायी व्याख्यान...
No comments:
Post a Comment