उदगीर- कै. रसिका महाविद्यालय, देवणी येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन ब- विभाग वेटलिफ्टिंग (पुरुष) स्पर्धेत महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सक्रिय खेळ दाखवीत सुवर्ण -1, रौप्य- 3, कास्य- 2 एकूण 6 पदके पटकाविले आहेत. विनम्रसागर काळे - प्रथम (वजनगट 95 कि.ग्रॅ), शुभम राठोड - द्वितीय (वजन गट 75 कि.ग्रॅ), मंथन चांदणे - द्वितीय (वजन गट 70 कि.ग्रॅ), मोसीन शेख - द्वितीय (वजन गट 65 कि.ग्रॅ), रामेश्वर श्रीमंडळे - तृतीय (वजन गट 75 कि.ग्रॅ), अल्ताफ लदाफ - तृतीय (वजन गट 60 कि.ग्रॅ) या खेळाडूंचा समावेश होता. खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे व प्रा. रमजू शेख यांचे मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल विजयी खेळाडूंचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
साहित्याचा अभ्यास व्यक्तीला नीतिमान बनवतो - प्रा. दायमी अब्दुल रहीम
उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी उर्दू वाङ्मय मंडळाचे उद्घाटन जमहूर कनिष्ठ महाविद्यालया...
-
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि लातूर उपकेंद्राच्या अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार २०२६ रिस...
-
महात्मा गांधी यांच्या विचारांवर आधारित परिसंवादात मान्यवरांनी सत्य, अहिंसा व मानवतेची मूल्ये आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे...
No comments:
Post a Comment