Wednesday, September 9, 2026

विज्ञान शाखेतील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात विज्ञान शाखेतील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नव्याने महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना महाविद्यालयीन जीवनाची ओळख करून देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य राजकुमार मस्के होते. यावेळी विज्ञान शाखेतील प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वागत गीत साफिया शेख यांनी सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहीन सयदा व तांबोळी मुस्कान यांनी केले. त्यांनी कार्यक्रमातील विविध उपक्रमांचे सुंदर आणि प्रभावी पद्धतीने सूत्रसंचालन करून उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी प्राचार्य मस्के यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत महाविद्यालयीन जीवनात शैक्षणिक प्रगतीसोबतच विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी गौरवी भगवान बिरादार यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी व आयोजकांचे आभार मानले. 

No comments:

Post a Comment

साहित्याचा अभ्यास व्यक्तीला नीतिमान बनवतो - प्रा. दायमी अब्दुल रहीम

उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी उर्दू वाङ्मय मंडळाचे उद्घाटन जमहूर कनिष्ठ महाविद्यालया...