उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागात अध्यापन कार्य करणारे प्रा. राहुल अशोकराव बिरादार आणि कनिष्ठ महाविद्यालयातील जीवशास्त्र विभागातील प्रा. शिल्पा गुरदाळे यांना ‘आदर्श शिक्षक सन्मानपत्र’ देऊन गौरविण्यात आले. लायन्स क्लब ऑफ उदगीर व उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय, उदगीर यांच्या संयुक्त सहकार्याने शिक्षक दिनानिमित्त हा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय व समर्पित कार्याची दखल घेत हे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय, उदगीर येथे झालेल्या कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. लायन्स क्लबच्या अध्यक्षा लायन्स सिमता लखोटिया, सचिव लायन्स रामकृष्ण बाहेती, कोषाध्यक्ष लायन्स तृप्ती मुंदडा, प्रोजेक्ट चेअरमन लायन्स बालाजी सोलापूरे तसेच लायन्स परिवाराच्या उपस्थितीत सन्मानपत्र देण्यात आले. त्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
साहित्याचा अभ्यास व्यक्तीला नीतिमान बनवतो - प्रा. दायमी अब्दुल रहीम
उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी उर्दू वाङ्मय मंडळाचे उद्घाटन जमहूर कनिष्ठ महाविद्यालया...
-
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि लातूर उपकेंद्राच्या अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार २०२६ रिस...
-
महात्मा गांधी यांच्या विचारांवर आधारित परिसंवादात मान्यवरांनी सत्य, अहिंसा व मानवतेची मूल्ये आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे...
No comments:
Post a Comment