उदगीर - महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी भारतीय ज्ञान प्रणाली या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानात रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय, मुंबई येथील सहाय्यक प्राध्यापक सुश्री कौमुदी शाह यांनी मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात सुश्री शाह यांनी भारतीय ज्ञानपरंपरेचे विज्ञान, गणित, खगोलशास्त्र, धातुशास्त्र, आरोग्य, शिक्षण आदी विविध क्षेत्रांतील योगदान आणि प्राचीन भारतीय ज्ञानाची समृद्ध परंपरा याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अलापूरे राहुल वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख यांनी तर आभार प्रदर्शन आयकेएस समन्वयक डॉ. एस. एम. सूर्यवंशी, इंग्रजी विभाग यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांच्यासह विविध विभागांतील प्राध्यापक व विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. व्ही. एस. नागपुर्णे, कु. मुस्कान मनियार, डॉ. पी. एस. शेटे व डॉ. सचिन पाटील यांनी सहकार्य केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
साहित्याचा अभ्यास व्यक्तीला नीतिमान बनवतो - प्रा. दायमी अब्दुल रहीम
उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी उर्दू वाङ्मय मंडळाचे उद्घाटन जमहूर कनिष्ठ महाविद्यालया...
-
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि लातूर उपकेंद्राच्या अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार २०२६ रिस...
-
महात्मा गांधी यांच्या विचारांवर आधारित परिसंवादात मान्यवरांनी सत्य, अहिंसा व मानवतेची मूल्ये आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे...
No comments:
Post a Comment