Monday, September 28, 2026

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा


उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. संजय बीबीनवरे हे लाभले होते. त्यांनी 'माहितीचा अधिकार' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माहिती अधिकार कायदा काय आहे, त्याचा वापर सामान्य नागरिक कसा करू शकतो, अर्ज कसा करावा आणि या कायद्यामुळे प्रशासनात कशी पारदर्शकता आली याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या अधिकारांसोबतच कर्तव्याचीही जाणीव करून दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बालाजी होकर्णे यांनी केले, तर आभार दिनविशेष समिती प्रमुख प्रा. डॉ. एम. जे. कुलकर्णी यांनी मानले. या प्रसंगी वाणिज्य विभागातील प्रा. डॉ. एस. एन. घोंगडे, प्रा. म्हेत्रे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

साहित्याचा अभ्यास व्यक्तीला नीतिमान बनवतो - प्रा. दायमी अब्दुल रहीम

उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी उर्दू वाङ्मय मंडळाचे उद्घाटन जमहूर कनिष्ठ महाविद्यालया...