उदगीर- महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिन विविध शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, सूक्ष्मजीवशास्त्र प्रश्नमंजुषा आणि पोस्टर सादरीकरण अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धांमध्ये सूक्ष्मजीवशास्त्र, प्रतिजैविक प्रतिरोधकता आणि सूक्ष्मजीवांचा मानवी जीवनावरील परिणाम यांसारख्या विषयांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शारदा महाविद्यालय, परभणी येथील डॉ. चामले डी. आर. उपस्थित होते. मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील करिअरच्या संधी तसेच संशोधनाच्या विविध क्षेत्रांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी या विषयातील बदलत्या संधींचा लाभ घेऊन संशोधनवृत्ती विकसित करावी, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. हल्लाळे एस. एन. होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील उपलब्ध शैक्षणिक संधींचा योग्य लाभ घेऊन उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. पोस्टर सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. बिरादार शुभांगी, द्वितीय क्रमांक कु. बिरादार अनघा, तर तृतीय क्रमांक कु. कांबळे प्रतीक्षा यांनी मिळविला. सूक्ष्मजीवशास्त्र प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक केंद्रे श्रीनिवास, द्वितीय क्रमांक करिअप्पा ममता, तर तृतीय क्रमांक कांबळे हर्षद यांनी पटकावला. निबंध लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक पाटील प्रितम, द्वितीय क्रमांक करिअप्पा ममता, तर तृतीय क्रमांक कांबळे रितेश, शेख सफुरा व बिरादार शुभांगी यांनी मिळविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. अल्लापूरे राहुल यांनी केले, तर आभार श्री. लांडगे एस. बी. यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. शैलेश ममदापूरे, डॉ. सबिना शेख, श्री. हाशमी, डॉ. व्ही. एस. नागपुर्णे, कु. मनियार मुस्कान, डॉ. सचिन पाटील तसेच सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
साहित्याचा अभ्यास व्यक्तीला नीतिमान बनवतो - प्रा. दायमी अब्दुल रहीम
उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी उर्दू वाङ्मय मंडळाचे उद्घाटन जमहूर कनिष्ठ महाविद्यालया...
-
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि लातूर उपकेंद्राच्या अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार २०२६ रिस...
-
महात्मा गांधी यांच्या विचारांवर आधारित परिसंवादात मान्यवरांनी सत्य, अहिंसा व मानवतेची मूल्ये आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे...
No comments:
Post a Comment