Thursday, September 17, 2026

संस्थापक प्राचार्य डॉ. ना. य. डोळे यांच्या प्रतिमेचे अनावरण


उदगीर-महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ. ना. य. डोळे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी महाविद्यालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्टाफ रूममध्ये त्यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा संपन्न झाला. प्राचार्य प्रा. डॉ. ना. य. डोळे यांनी आपल्या कार्यकाळात महाविद्यालयाच्या जडणघडणीत अत्यंत मोलाची भूमिका बजावली. महाविद्यालयाच्या शैक्षणिक, प्रशासकीय तसेच सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अनेक नवनवीन उपक्रम व प्रयोग राबविले. दूरदृष्टी, नावीन्यपूर्ण विचार आणि शैक्षणिक कार्याप्रती असलेल्या निष्ठेच्या बळावर त्यांनी महाविद्यालयाला विकासाच्या दिशेने पुढे नेत यशाच्या शिखरावर नेऊन ठेवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा आजही महाविद्यालयाच्या वाटचालीला प्रेरणा देणारा आहे, त्यांच्या कार्याची आठवण सदैव जिवंत राहावी तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्टाफ रूममध्ये त्यांची प्रतिमा लावण्यात आली. प्रतिमेच्या माध्यमातून संस्थापक प्राचार्यांच्या शैक्षणिक योगदानाचे स्मरण कायम राहून पुढील पिढीतील शिक्षकांना उत्कृष्ट कार्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, संस्था सदस्य अ‍ॅड. अजय दंडवते, डॉ. श्रीकांत मध्वरे, शिवराज वल्लापुरे, प्रा. आडेप्पा अंजुरे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, माजी प्राचार्य उमाटाळे, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थापक प्राचार्य डॉ. ना. य. डोळे यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या प्रेरणादायी स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला.

No comments:

Post a Comment

साहित्याचा अभ्यास व्यक्तीला नीतिमान बनवतो - प्रा. दायमी अब्दुल रहीम

उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी उर्दू वाङ्मय मंडळाचे उद्घाटन जमहूर कनिष्ठ महाविद्यालया...