उदगीर: (दि. 9 सप्टेंबर 2026) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर - विभागीय क्रॉस कंट्री /10 कि. मी. धावणे (पुरुष) आणि आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री (महिला) स्पर्धा महाविद्यालय परिसरामध्ये संपन्न झाली. या स्पर्धेत विद्यापीठ परिक्षेत्रातील लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अ, ब, क, ड या 04 विभागातून 24 पुरुष खेळाडू तर 9 महाविद्यालयातून 26 महिला खेळाडूंनी सहभाग घेतला होता. याचबरोबर संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक व पंच यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रकाश तोंडारे तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे अधिसभा सदस्य ग्रंथपाल डॉ. विष्णू पवार हे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कोषाध्यक्ष महादेव नौबदे, क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष अजय दंडवते, पंचप्रमुख डॉ. सचिन चामले, निवड समिती सदस्य डॉ. आदित्य माने, निजाम शेख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेचा अंतिम निकाल पुरुष गट- वैयक्तिक प्रथम- प्रतीक पवार (संत जनाबाई महाविद्यालय, गंगाखेड), द्वितीय- वैभव तरंगे (श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी), तृतीय- माऊली सातपुते (संत जनाबाई महाविद्यालय, गंगाखेड) तर सांघिक विजेतेपद अनुक्रमे प्रथम- डी झोन, द्वितीय- सी झोन, तृतीय- ए झोन याप्रमाणे यश संपादन केले.
महिला गट - वैयक्तिक प्रथम- पुष्पा राठोड ( जयक्रांती महाविद्यालय, लातूर ) द्वितीय - स्वाती उगळे (श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी) तृतीय- वैष्णवी राठोड(महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर ) तर सांघिक विजेतेपद अनुक्रमे प्रथम- महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर, द्वितीय - कै. रमेश वरपूडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनपेठ याप्रमाणे यश संपादन केले.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच प्रा. डॉ. निहाल खान, डॉ. शिवानंद पाटील, प्रा. डॉ. डी.आर मुंडे, डॉ. पंडित प्रभाकर, लक्ष्मण सोनकांबळे, कु. सोनल उदबळे, वैभव अंभोरे, वीरसागर काळे, साईनाथ कांबळे, रोहन एनाडले, प्रा. शेख रमजू, रोहित कांबळे, प्रा. संजय बिबीनवरे, प्रताप भालेराव यांनी कामे पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांनी तर प्रास्ताविक व आभार क्रीडा संचालक प्रा.सतीश मुंढे यांनी केले.
No comments:
Post a Comment