Saturday, July 25, 2026

उदयगिरी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेनेतर्फे कारगिल विजय दिवस साजरा


उदगीर —  कॅप्टन कृष्णकांत स्मारक, कृष्णकांत चौक येथे महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेनेने उत्साहात कारगिल विजय दिवस साजरा केला. कार्यक्रमात कॅप्टन कृष्णकांत यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर होते, त्यांनी युवा पिढीमध्ये देशभक्तीचे बीज पेरावे अशी प्रेरणा दिली. एनसीसी कंपनी कमांडर कॅप्टन डॉ. राम साबदे यांनी देशसेवेचे महत्त्व आणि कारगिल युद्धातील शूरवीरांच्या बलिदानाबद्दल बोलून विद्यार्थ्यांना प्रेरीत केले. एनसीसीचे सर्व छात्रसैनिक आणि एनसीसी बटालियनचे पीआय स्टाफ सुभेदार दरबार सिंह, हवालदार सुनील कुमार काळे आणि हवालदार अमोल मोरे यांनीही कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला

No comments:

Post a Comment

उदयगिरी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेनेतर्फे कारगिल विजय दिवस साजरा

उदगीर —  कॅप्टन कृष्णकांत स्मारक, कृष्णकांत चौक येथे महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेनेने उत्साहात कारगिल विजय दिवस साजरा केला....