उदगीर : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनेचा तसेच दिल्ली येथे विद्यार्थ्यावर झालेल्या अमानुष मारहाणीचा तीव्र निषेध नोंदविला. यावेळी सर्वांनी काळ्या फिती (Black Ribbon) लावून निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या अशा गैरप्रकारांविरोधात कठोर कारवाई व्हावी, तसेच देशातील सर्व स्पर्धा परीक्षा पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पद्धतीने घेण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली शांततापूर्ण पद्धतीने पार पडलेल्या या आंदोलनात महाविद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या उत्स्फूर्त सहभाग नोंदवून परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात एकजूट दर्शविली. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी ऋषिकेश गायकवाड, अभिनव देवकते, पठन इर्षाद, पठाण आसिया, शेख नुसरत, तांबोळी मुस्कान, सय्यदा माहीन यांनी पुढाकार घेतला.

No comments:
Post a Comment