Wednesday, April 15, 2026

उदयगिरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वाचन, रक्तदान आणि अभिवादनाचा संगम

 


उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांचे आयोजन करून उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांसह प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

या निमित्ताने १८ तास अखंड वाचन उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे वाचन करून सामाजिक जाणीव जागृत करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राष्ट्रीय सेवा योजना तसेच राष्ट्रीय छात्र सेना यांच्या वतीने महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजसेवेची भावना व्यक्त केली. या उपक्रमामुळे मानवतेचा संदेश देण्यात आला.

ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ. आंबेडकर लिखित व त्यांच्यावरील विविध पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन ज्ञानार्जन केले. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य शिवराज वल्लापूरे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. प्रवीण जाहुरे यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत, विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्शांचा अवलंब करावा असे आवाहन केले. एकूणच, वाचन, रक्तदान आणि अभिवादनाचा संगम घडवून आणणारी ही आंबेडकर जयंती महाविद्यालयात साजरी झाली.

No comments:

Post a Comment

उदयगिरीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. महाराष्ट...