उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण मंडळाचे उद्घाटन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला, अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर होते तर उद्घाटक म्हणून उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे उपस्थित होते, मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष माधवराव नोबदे, सदस्य इंजि. मन्मथ बिरादार, श्रीमती भाग्यश्री चाकूरकर, प्रा. आडेप्पा अंजुरे, शिवराज वल्लापुरे, भीमाशंकर मुद्दा, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, उपप्राचार्य डॉ. एस.एन. हल्लाळे, उपप्राचार्य टी.एन. सगर, पर्यवेक्षक प्रा. एस. व्ही. मुडपे व विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रभारी प्रा. डॉ. एस. एन. लांडगे यांची उपस्थिती होती. विविध मान्यवरांनी ठेवलेल्या पारितोषिकांचे वितरण बारावी, पदवी व पदव्युत्तर गुणवंत विद्यार्थ्यांना करण्यात आले, दीपप्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते कल्याण मंडळाचे उद्घाटन झाले व विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली, प्रातिनिधिक पाच विद्यार्थ्यांना परीक्षा फीची रक्कम परत करण्यात आली. यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे म्हणाले, विद्यार्थी कल्याण मंडळाच्या माध्यमातून नेतृत्व क्षमता विकसित होत असते, विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन समाजाचे प्रश्न समजून सोडवण्याचा प्रयत्न करावा. अध्यक्षीय समारोपात बसवराज पाटील नागराळकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी संकल्प केल्यास यश अशक्य नाही, न्यूनगंड व नकारात्मक विचार सोडून द्यावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली, प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. डॉ. अर्चना मोरे यांनी केले, पारितोषिक वितरणाचे वाचन प्रा. डॉ. ए. यु. नागरगोजे, प्रा. डॉ. आर. बी. अलापुरे, प्रा. प्रवीण जाहुरे, प्रा. डॉ. एम.जे. कुलकर्णी यांनी केले तर आभार विद्यापीठ प्रतिनिधी आसिया पठाण हिने मानले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
उदयगिरीत विद्यार्थी कल्याण मंडळ उद्घाटन व गुणवंतांचा सत्कार संपन्न
उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण मंडळाचे उद्घाटन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात...
-
उदगीर - शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...
-
उदगीर- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि लातूर उपकेंद्राच्या अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार २०२६ रिस...
-
महात्मा गांधी यांच्या विचारांवर आधारित परिसंवादात मान्यवरांनी सत्य, अहिंसा व मानवतेची मूल्ये आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे...
No comments:
Post a Comment