उदगीर—महाराष्ट्र उदयागिरी महाविद्यालयाच्या मराठी विभागात प्रा. रामदास केदार आणि प्रा. बिभीषण मद्देवाड यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. रामदास केदार यांचे साहित्य महाराष्ट्र व गोवा राज्यांच्या शालेय अभ्यासक्रमांत निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. बालभारती, महाराष्ट्राने त्यांच्या कवितेला "गीत मराठी गाऊया" हा सहावीच्या अभ्यासक्रमात आणि गोवा राज्याने त्यांचे बालनाटक "वाचणारी डोकी हवीत" हे पाचवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे. तसेच महाराष्ट्रातील चार विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांतही त्यांच्या साहित्याची निवड झाली आहे. याच कार्यक्रमात प्रा. बिभीषण मद्देवाड यांनाही सन्मानित करण्यात आले. रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान, पत्रकारिता, साहित्य संमेलन, राज्य साहित्य-संस्कृती मंडळाच्या कार्यक्रमांपासून विविध आरोग्य शिबिरे, मुलींच्या नावाने केलेले एफडी, शिक्षक साहित्य संमेलन, राष्ट्रीय लघुपट महोत्सव, पर्यावरण पूरक उपक्रम, पथनाट्याद्वारे मतदार जाणीव जागृती अशा क्षेत्रात त्यांच्या बहुप्रकारच्या सेवेमुळे ते परिचित आहेत. त्यांच्या या समर्पित कार्याबद्दल मराठी विभागाकडून त्यांचाही सत्कार करण्यात आला.
सत्कार कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. एन. हल्लाळे, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार, प्रा. डॉ. बी. आर. दहिफळे आणि इतर सर्व उपस्थित प्राध्यापकांच्या हस्ते दोन्ही माजी विद्यार्थ्यांमचा सत्कार करून अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
No comments:
Post a Comment